आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
2022-23 या आर्थिक वर्षात एचआयटीईएसच्या निव्वळ नफ्यात 58% वाढ
Posted On:
06 APR 2023 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2023
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या एचएलएल इन्फ्रा टेक सर्विसेस लिमिटेड (एचआयटीईएस) या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण उलाढालीत 19 टक्क्यांनी अर्थात 361.38 कोटी रुपयांपर्यंत वाढ नोंदवली आहे. त्याच्या निव्वळ नफ्यात 58 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एचआयटीईएसने 2022-23 मध्ये 27.76 कोटी रुपयांचा कर भरल्यानंतरचा नफा नोंदवला. एका वर्षापूर्वी तो 17.60 कोटी रुपये होता. नऊ वर्षांपूर्वी समाविष्ट केलेल्या, केवळ 2 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असलेल्या मिनीरत्न उपकंपनीसाठी ही महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. 2021-22 मधील 303.40 कोटी रुपयांच्या तुलनेत याच कालावधीत एकूण उलाढाल 361.38 कोटी रुपये होती.
प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकास व्यवसायामुळे हे लक्षणीय सकारात्मक परिणाम प्राप्त झाले आहेत. भटिंडा, गोरखपूर आणि गुवाहाटी येथे नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) पूर्ण झाले आणि गेल्या आर्थिक वर्षात अनेक प्रकल्पांचे अद्ययावतीकरण झाले. याचा यावर प्रभाव आहे.
एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (एचएलएल) हा 50 वर्षे जुना सरकारी उपक्रम आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत तो काम करतो. आरोग्यसेवा क्षेत्रातील बांधकाम आणि खरेदी व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने, एचआयटीईएस- एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेड ची स्थापना 3 एप्रिल 2014 रोजी करण्यात आली. पायाभूत सुविधा निर्माण करण्याव्यतिरिक्त, खरेदी सल्लामसलत, सुविधा व्यवस्थापन आणि जैव-वैद्यकीय अभियांत्रिकी सेवाही ती प्रदान करते.
एचआयटीईएसचा पायाभूत सुविधा विकास विभाग वास्तूविषयक, संरचनात्मक आणि एमईपी प्रारुप, अंदाज, बोली प्रक्रिया व्यवस्थापन, प्रकल्प आणि बांधकाम व्यवस्थापन यासह कामाच्या ठिकाणाचे पर्यवेक्षण, करार व्यवस्थापन, सुविधा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात सेवा देतो. संस्थात्मक, व्यावसायिक, निवासी, पर्यटनाशी संबंधित प्रकल्प आदी वैविध्यपूर्ण क्षेत्रात ते "संकल्पना ते कमिशनिंग" पर्यंत सर्वसमावेशक सेवा प्रदान करतात.
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1914244)
Visitor Counter : 188