राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण सुदानच्या संसदीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 05 APR 2023 2:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2023

 

दक्षिण सुदानमधील ट्रान्झिशनल नॅशनल असेंबलीच्या अध्यक्ष जेम्मा नूनु कुम्बा यांच्या नेतृत्वाखाली संसदीय शिष्टमंडळाने आज (5, एप्रिल 2023) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत आणि दक्षिण सुदानचे सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भारतीय सेनेचा मोठा सहभाग असल्याचा भारताला अभिमान आहे असे त्या म्हणाल्या. शांतता मोहिमेव्यतिरिक्त, भारतीय सैनिक महत्त्वाची मानवतावादी भूमिका बजावत आहेत आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यात योगदान देत आहेत असे त्या म्हणाल्या.

दक्षिण सुदानसाठी विश्वासार्ह विकास भागीदार बनण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारताच्या आयटीईसी आणि आयसीसीआर  शिष्यवृत्ती कार्यक्रमांद्वारे पुरवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती संधींचा दक्षिण सुदानमधील युवक लाभ घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन संविधानाचा मसुदा तयार करण्यासह सध्या सुरु  असलेल्या राजकीय प्रक्रियेत संसदीय लोकशाहीतील भारताच्या अनुभवांचा दक्षिण सुदानला लाभ होऊ  शकतो असे राष्ट्रपती म्हणाल्या.  या प्रक्रियेत भारत दक्षिण सुदानला पूर्ण पाठिंबा देईल, असेही त्या म्हणाल्या. 

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913848) Visitor Counter : 157