युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी कानपूर येथे 5-6 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या वाय-20 सल्लामसलत कार्यक्रमात भावी धोरणांना साकारण्यावर युवा वर्ग करणार विचारमंथन


1200 पेक्षा जास्त युवा प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार

Posted On: 04 APR 2023 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2023

 

भारताच्या जी-20 अध्यक्षतेंर्गत 5 आणि 6 एप्रिल 2023 रोजी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी(आयआयटी) कानपूर युवा-20 सल्लामसलतीचे आयोजन करणार आहे. आयआयटी कानपूरमध्ये होणार असलेल्या या या युवा-20 मध्ये भारतातील आणि परदेशातील 1200 पेक्षा जास्त युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर नवोन्मेषी उपाययोजना शोधण्याच्या उद्देशाने परस्परांमध्ये संवाद घडवण्यासाठी, आपल्या कल्पना आणि अनुभव यांची देवाणघेवाण करण्यासाठी  आणि विचारमंथन करण्यासाठी युवा विद्वत्तेला एकत्र आणणारे वाय-20 हे व्यासपीठ आहे. उत्तर प्रदेशात वाराणसी येथे आयोजित होणाऱ्या अंतिम युवा-20 शिखर परिषदेपूर्वी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या देखरेखीखाली होणारे युवा-20 सल्लामसलत सत्र हा एक देशव्यापी कार्यक्रम आहे. या चर्चासत्रात होणाऱ्या विचारमंथनाचा भावी काळातील धोरणे तयार करण्यासाठी उपयोग होईल.  

वाय-20 शिखर परिषदेसाठी पाच मुख्य संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आयआयटी कानपूर “ कामाचे भवितव्यः उद्योग 4.0, नवोन्मेष आणि 21 व्या शतकातील कौशल्ये आणि “ आरोग्य, निरामयता आणि क्रीडाः युवा वर्गासाठी जाहीरनामा” या दोन संकल्पनांवर वाय-20 सल्लामसलत सत्रात विचारमंथन करणार आहे.

आयआयटी कानपूरचे प्रोफेसर अभय करंदीकर म्हणाले, “ भारताने जी-20 चे अध्यक्षपद भूषवणे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.  भारताच्या अध्यक्षतेखाली एका चांगल्या भविष्याकरता चर्चा करण्यासाठी, कल्पना मांडण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी युवा वर्गाला एकत्र आणणारा हा कार्यक्रम आहे.”

आयआयटी कानपूरमध्ये होणाऱ्या वाय20 सल्लामसलत सत्राअंतर्गत “आरोग्याचे भवितव्य”, “शाश्वत भविष्यासाठी तंत्रज्ञान” आणि “कामाच्या भविष्यासाठी नवोन्मेष” या दोन विषयांवर देखील निमंत्रित मान्यवर आणि उद्योजकांच्या पॅनेल चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या अभ्यागतांना पॅनेलिस्टसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.  

पॅनेल चर्चांव्यतिरिक्त वाय-20 सल्लामसलत सत्राचा भाग म्हणून 50 पेक्षा जास्त स्टॉल्स असलेले एक भव्य प्रदर्शन देखील आयोजित होणार आहे. आयआयटी कानपूरच्या स्टार्टअप्स इन्क्युबेशन आणि इनोवेशन सेंटरच्या वतीने उभारण्यात आलेल्या टेक स्टॉल्ससोबत यामध्ये  विज्ञान आणि नवोन्मेष आणि शिक्षण यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.  हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताचा समावेश असलेल्या सांस्कृतिक रजनी कार्यक्रमाचे आयोजन आणि त्यानंतर रात्रीच्या मेजवानीचे आयोजन करून आयआयटी कानपूरमधील वाय-20 सल्लामसलत कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.   

 

आयआयटी कानपूरविषयीः

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी(आयआयटी) कानपूर ची स्थापना 2 नोव्हेंबर 1959 रोजी संसदेच्या कायद्यान्वये करण्यात आली होती. नियमित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांव्यतिरिक्त ही संस्था उद्योग आणि सरकार या दोघांना उपयुक्त ठरणाऱ्या क्षेत्रात संशोधन आणि विकास कार्यक्रमात सक्रीय आहे. अधिक माहितीसाठी येथे www.iitk.ac.in भेट द्या.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913702) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu , Hindi