गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छ भारत मिशन (शहरी) 2.0 साठी सामाजिक दायित्व

Posted On: 03 APR 2023 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2023

 

स्वच्छ भारत मिशन - शहरी  (एसबीएम-यू) चा प्रारंभ ऑक्टोबर 2014 मध्‍ये करण्‍यात आला आहे. याचा उद्देश शहरी भाग उघड्यावर शौचास बसण्‍यापासून मुक्त कर हा आहे. तसेच सर्व महापालिकांनी घन कच-याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन  यंत्रणा कार्यान्वित  करावी, हा आहे. एसबीएम-यू मोहिमेने साधलेल्या प्रगतीनंतरचा टप्पा म्हणजे एसबीएम-यू 2.0 सुरू करण्‍यात आला आहे. या टप्प्‍यामध्‍ये वैयक्तिक, घरामध्‍ये असलेली शौचालये, सार्वजनिक शौचालये बांधणे,  उपयोगात आणलेल्या पाण्‍याचे व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन करणे,  माहिती, शिक्षण संपर्क यंत्रणा निर्माण  तसेच वर्तनामध्‍ये बदल घडवून आणणे, क्षमता निर्मिती, कौशल्य विकास आणि ज्ञान, माहितीचे  व्यवस्थापन अशा  कामांसाठी केंद्र सरकारकडून  निधी जारी केला जातो.

अमृतद्वारे निर्माण केलेल्या कामांना  वेगाने पुढे नेण्यासाठी, ‘अमृत  2.0’ ही मोहीम  ऑक्टोबर 2021 मध्‍ये  सुरू  करण्यात आली आहे. या अभियानाचा   उद्देश मोठ्या प्रमाणावर  पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सुधारणा कामे हाती घेऊन शहरी भागात राहणा-या सर्व नागरिकांना जीवन सुलभता  प्रदान करणे हा आहे. राज्य जल कृती आराखड्यांमध्ये 1,29,636 कोटी रूपये खर्चाच्या(ऑपरेशन आणि मेंटनन्ससह) 6,527 प्रकल्पांच्या कामांचा आत्तापर्यंत  समावेश झाला आहे. हा निधी गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाच्या  सर्वोच्च समितीने मंजूर केला  आहे.

एसबीएम 2.0 आणि अमृतअमृत  2.0 योजनांना दि. 1 ऑक्टोबर, 2021 पासून  देशातील सर्व शहरी भागात प्रारंभ झाला आहे. या मोहिमेसाठी एकूण खर्चाचा आराखडा अनुक्रमे 1,41,600 कोटी रूपये आणि 2,77,000 कोटी रूपये आहे.  यामध्‍ये केंद्राचा हिस्साही समाविष्ट आहे. तसेच या दोन योजनांतर्गत कंपनी सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीचे तपशील ठेवण्‍यासाठी कोणतीही तरतूद नाही.

अशी माहिती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामध्‍ये दिली.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1913441) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu