संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत: गोवा आणि कोची येथील नौदल विमान यार्डच्या आधुनिकीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाचा अल्ट्रा डायमेंशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत 470 कोटी रुपयांचा करार
Posted On:
31 MAR 2023 10:10PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी गोवा आणि कोची येथील नौदल विमान यार्डच्या आधुनिकीकरणासाठी विशाखापट्टणम स्थित अल्ट्रा डायमेंशन्स प्रा. लि.सोबत अंदाजे 470 कोटी रुपये खर्चाच्या करारावर स्वाक्षरी केली. नेव्हल एअरक्राफ्ट यार्डस गोवा आणि कोची येथे नौदल विमान, एरो इंजिन, रोटेबल्स आणि चाचणी उपकरणांची देखभाल /दुरुस्ती करतात.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक विमाने समाविष्ट करण्यासाठी नौदल विमान यार्डमधील विद्यमान देखभाल आणि दुरुस्ती सुविधांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे ,जेणेकरुन वर्तमान आणि भविष्यातील विमान वाहतूक देखभाल संबंधी आव्हानाना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान आणि क्षमतेतील तफावत भरून काढता येईल. आधुनिकीकरणामध्ये अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रसामुग्री आणि कंपोझिट रिपेअर बेजसह दुरुस्ती सुविधांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे तीन वर्षांच्या कालावधीत 1.8 लाख मनुष्य-दिवसांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल.
आधुनिकीकरणामुळे नौदल हवाई प्लॅटफॉर्मची परिचालन सज्जता वाढेल आणि दुरुस्तीसाठी बाहेरच्या संस्था आणि परदेशी मूळ उपकरण उत्पादकांवरील अवलंबित्व कमी होईल. हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’चा गौरवशाली ध्वजवाहक असेल.
याव्यतिरिक्त, संरक्षण मंत्रालयाने रांची येथील मेकॉन लिमिटेड बरोबर प्रकल्प देखरेख सल्लागार म्हणून 24 कोटी रुपये खर्चाचा करार केला आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912719)
Visitor Counter : 144