राष्ट्रपती कार्यालय
इस्रायलच्या संसदीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
31 MAR 2023 8:29PM by PIB Mumbai
इस्रायलच्या एका संसदीय शिष्टमंडळाने आज (31 मार्च 2023) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. इस्रायलच्या नेसेटचे अध्यक्ष अमीर ओहाना यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले आहे.
शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या 30 वर्षांमध्ये उभय देशांमधील राजनैतिक संबंध बहुआयामी धोरणात्मक भागीदारीत वृद्धिंगत झाले आहेत.
त्यांच्या प्रदीर्घ इतिहासात, भारतातील ज्यू समुदायांनी त्यांचा अनोखा वारसा आणि परंपरा जपल्या आणि समृद्ध केल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले . ज्यू लोक भारताच्या संमिश्र समाजाचा अविभाज्य भाग आहेत - आणि नेहमीच राहतील असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतामध्ये इस्रायल हे प्रगत कृषी आणि जल तंत्रज्ञानातील कौशल्याचा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते. संशोधन आणि नवोन्मेषातील आपल्या सहकार्यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळाली आहे. इस्रायलच्या सहाय्याने देशभरात स्थापन करण्यात आलेल्या ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ च्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1912717)