विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताचे स्टार्टअप्स जागतिक मापदंड स्थापित करत आहेत - डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
31 MAR 2023 4:00PM by PIB Mumbai
भारताचे स्टार्टअप्स तसेच संशोधन आणि विकास क्षेत्रातील संशोधने जागतिक मापदंड स्थापित करत असून ते जागतिक तोडीचेही आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
श्री पद्मावती व्यंकटेश्वर फाउंडेशनच्या वतीने नवी दिल्लीत आयोजित श्री रामकृष्ण परमहंस अनुदान प्रदान सोहळ्यात डॉ जितेंद्र सिंह बोलत होते.
कप्या-कप्यात स्वतंत्र्यपणे काम करण्याबद्दल सावध करत, एकत्रित प्रयत्नांचे लाभ मिळवण्यासाठी शिक्षण, स्टार्टअप, संशोधन संस्था आणि उद्योग यांसारख्या सर्व हितसंबंधितांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले.
भारताने वैज्ञानिक संशोधन आणि विकासात पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवले आहे.कोविड महामारीच्या काळात जैवतंत्रज्ञान विभागाने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
कोविडच्या दोन वर्षांमध्ये भारत संसर्गजन्य रोगांपासून असंसर्गजन्य रोगांकडे गेला हा गेल्या तीन ते पाच दशकांमधला मोठा बदल आहे. ''गर्भधारणेदरम्यान मधुमेहाच्या व्यवस्थापनाची जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे ज्या एका गटाने तयार केली आहेत त्याच्याशी मी संबंधित आहे'', असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.
नवोदित शास्त्रज्ञांचा गौरव केल्याबद्दल श्री पद्मावती व्यंकटेश्वर फाउंडेशनची प्रशंसा करत सरकारी प्रयत्नांना अधिक जोम देण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये अधिक खाजगी सहभाग वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
समाजाच्या ऋणाची परतफेड आणि मोठ्या प्रमाणावर समाजासाठी काही उपयुक्त कार्य करणे यासारखे प्रतिष्ठित व्यावसायिकांसाठी दुसरे कोणतेही उदात्त कार्य नाही, असे मंत्री म्हणाले.
यावेळी डॉ जितेंद्र सिंह यांनी जैव वैद्यकीय विज्ञान आणि कृषी विज्ञानासाठी अनुदान प्रदान केले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912538)
Visitor Counter : 173