रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नवी दिल्ली येथे झाली रस्ते आणि बुद्धिमान वाहतूक व्यवस्थेवरील भारत रशिया कृती गटाची पहिली बैठक

Posted On: 29 MAR 2023 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

रस्ते आणि बुद्धिमान वाहतूक व्यवस्थेवरील भारत रशिया कृतिगटाची पहिली बैठक 28 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीत झाली. भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि रशियन फेडरेशनचे वाहतूक मंत्रालय यांच्यामध्ये रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योग यांच्यावरील द्विपक्षीय सहकार्याचा सामंजस्य करार सप्टेंबर 2021 मध्ये झाला होता, त्या अंतर्गत हा कृतीगट स्थापन झाला.

रस्ते वाहतूक, अवजड सामान वाहतूक आणि बुद्धिमान वाहतूक व्यवस्था (ITS) तसेच हरित गतिशीलता या संदर्भात संपर्क आणि सहयोग यांच्यावर आधारित दीर्घायु तसेच परिणामकारक द्विपक्षीय बंध निर्माण व्हावेत हा या मागचा उद्देश आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय आणि रशियन फेडरेशनच्या वाहतूक मंत्रालयाचे उपमंत्री दिमित्री बाकानोव यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या चर्चेदरम्यान झालेल्या विचारविनिमयात दोन्ही देशांनी बुद्धिमान वाहतूक व्यवस्था, हरित गतिशीलता, रस्ते सुरक्षा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग या क्षेत्रात तंत्रज्ञानाचे उपयोजन यावर आपण केलेल्या उपाययोजनांची झलक प्रदर्शित केली.

रस्ते वाहतुकीच्या विकासात इंटेलिजंट वाहतूक व्यवस्थेचे उपयोजन आणि त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी यासाठी भारत आणि रशिया यांच्यामधील दीर्घकाळ सहकार्याचा मार्ग या चर्चेने प्रशस्त झाला.

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912062) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi