संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Posted On: 29 MAR 2023 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

दुसरा आफ्रिका-इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (AFINDEX-2023)" या संयुक्त लष्करी सरावाचा आज पुण्यातील फॉरेन ट्रेनिंग नोड, औंध,  येथे समारोप झाला.  

आफ्रिका -इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज,(AFINDEX-2023) दिनांक 16 ते 29 मार्च 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या बहुराष्ट्रीय सरावात आफ्रिका खंडातील  25 राष्ट्रे आणि भारतीय सैन्यातील शीख, मराठा आणि महार रेजिमेंट यांच्यासह एकूण 124 तुकड्या सहभागी झाल्या होत्या. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, सर्व आफ्रिकी प्रमुख आणि सहभागी  अधिकाऱ्यांनी सरावाचा प्रमाणीकरण टप्पा पाहिला.

सकारात्मक लष्करी संबंध निर्माण करणे, एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती आत्मसात करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार मानवतावादी भुसुरूंग विरोधी मोहीम आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची अंमलबजावणी करताना एकत्र काम करण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देणे; हे या सरावाचे उद्दिष्ट होते. या संयुक्त सरावामुळे सैन्याला अशा प्रकारच्या कारवाया करताना वेगवेगळ्या कार्यपद्धती आणि डावपेच शिकता येतात आणि त्यांचा अवलंब करता येतो. 

सराव दरम्यान निर्माण होणारा बंधुभाव,, प्रोत्साहन  आणि सद्भावना एकमेकांच्या संघटना आणि विविध प्रकारच्या कारवाया आयोजित करण्याच्या पद्धती समजून घेण्यास सक्षम करून सैन्यांमधील बंध आणखी सामर्थ्यशाली करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. हा सराव भविष्यात भारतीय आणि आफ्रिकी सैन्यांमधील अधिक सहकार्यासाठी एका नव्या अध्यायाचा  प्रारंभ ठरेल.

सरावाच्या पार्श्‍वभूमीवर ‘उपकरणांचे एक  प्रदर्शन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत उत्पादित 32 उद्योगांमधील 75 स्वदेशी उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले. आफ्रिकी लष्कर प्रमुख, प्रमुखांचे प्रतिनिधी आणि आफ्रिकी राष्ट्रांचे प्रतिनिधी यांनी   या प्रदर्शनात  सहभाग घेतला. 

 

* * *

M.Iyengar/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1911867) Visitor Counter : 229


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu