कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन संसद इमारत प्रकल्पात सहभागी असलेल्या 910 सुतारांना स्किल इंडियाने प्रमाणित केले

Posted On: 29 MAR 2023 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

लोकशाहीचे  मंदिर असलेली संसदेची इमारत  लवकरच 100 वर्षे पूर्ण करत आहे; आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे एक उदाहरण म्हणून संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आता आपलेच लोक, आपलेच “कारीगर” (कामगार) करत आहेत. आणि या कामगारांच्या प्रयत्नांची दखल घेऊन  कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत कार्यरत फर्निचर आणि फिटिंग स्किल कौन्सिलने , नवी दिल्ली महानगरपालिका समिती  अधिकार क्षेत्र आणि नरसी समूह यांच्या सहकार्याने 910 सुतारांना पूर्वशिक्षण मान्यता कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षित आणि प्रमाणित केले  आहे. सुतारांच्या कौशल्य प्रशिक्षणात वाढ करणे आणि भारताच्या प्रगतीचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवीन संसद भवनासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात योगदान देण्यास त्यांना सक्षम करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

हा कार्यक्रम संसदेत आयोजित करण्यात आला होता आणि त्यात वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

पूर्वशिक्षण मान्यता कार्यक्रम (रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग ) हा स्किल इंडियाच्या  प्रधानमंत्री कौशल विकास योजना या महत्वाकांक्षी योजनेचा एक घटक आहे आणि एखाद्या व्यक्तीचे विद्यमान कौशल्य ,औपचारिक, अनौपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षणाद्वारे मिळवलेले  ज्ञान आणि अनुभव यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाणारी मूल्यांकन प्रक्रिया आहे.

या कार्यक्रमात, उमेदवारांची  सर्वांगीण वाढ सुनिश्चित करण्यासाठी प्राथमिक मार्गदर्शन, समुपदेशन आणि सहाय्य प्रदान केले जाते. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयचे विविध कार्यक्रम आहेत , जे ते कौशल्य विकास उपक्रम पूर्ण करण्यासाठी विविध सरकारी संस्थांना पुरवतात. मंत्रालयाने नरसी समूहासह यापूर्वी विविध पूर्वशिक्षण मान्यता कार्यक्रम अंतर्गत  6,000 हून अधिक सुतारांना प्रशिक्षण दिले आहे. रोजगाराच्या संधी वाढवणे आणि कौशल्यांमधील तफावत दूर करण्यासाठी  ही प्रक्रिया प्रमाणित राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकटीनुसार देशातील  कर्मचार्‍यांची क्षमता वृद्धिंगत  करण्यात मदत करते.

अस्थिर रोजगार  बाजारपेठेत उमेदवारांना त्यांचे कौशल्य  वाढवण्यासाठी प्रमाणित करणे आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर,  कामगारांना बांधकाम, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, मातीची भांडी बनवणे आणि इतर अनेक व्यवसायांमध्ये कुशल बनवले  जाईल.यामुळे ते केवळ डिजिटल साक्षरता आणि उद्यमशीलतेच्या  संधींशी जोडले जाणार नाहीत, तर त्यांचे तांत्रिक कौशल्य देखील वाढेल.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911866)