गृह मंत्रालय
नवी दिल्लीत आयोजित 'भारत@100: सर्वसमावेशक आणि शाश्वत जागतिक विकासाचा प्रशस्त मार्ग' या संकल्पनेवर आधारित असोचेमच्या 2023 च्या वार्षिक सत्राला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
गेल्या 9 वर्षांपासून ‘संपूर्ण प्रशासकीय दृष्टिकोन’ आणि ‘टीम इंडिया’ या भावनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत देशाचे नेतृत्व
पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिले राजकीय स्थैर्य, भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा काळ 'राजकीय स्थैर्याचा काळ' म्हणून ओळखला जाईल
सरकारी धोरण आणि उद्योग यांच्यातील समन्वयासाठी असोचेम सारख्या संस्था कार्यरत
पायाभूत सुविधांवरील आणि लॉजिस्टिक खर्च कमी केल्याशिवाय औद्योगिक विकास शक्य नाही, दूरदृष्टी ठेवत 5 वर्षात लॉजिस्टिक खर्च कमी करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे उद्दिष्ट
Posted On:
28 MAR 2023 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
नवी दिल्लीत आयोजित 'भारत@100: सर्वसमावेशक आणि शाश्वत जागतिक विकासाचा प्रशस्त मार्ग ' या संकल्पनेवर आधारित असोचेमच्या 2023 च्या वार्षिक सत्राला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जेव्हा संपूर्ण देश प्रयत्नशील असेल तेव्हाच संपूर्ण भारताचा विकास तेव्हाच होऊ शकतो, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. जोपर्यंत भारताचा सर्वसमावेशक विकास होत नाही तोपर्यंत आपण आपले ध्येय साध्य करू शकत नाही, असे ते म्हणाले. अनेक जण 130 कोटी लोकसंख्येला मोठा भार समजतात पण ही मोठी बाजारपेठ आहे, याकडे शाह यांनी लक्ष वेधले. भारताच्या विकासासाठी जोपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

आज आपण भारताच्या राजकीय परीदृष्याचे विश्लेषण केले तर आपल्याला दिसते की, एक केंद्र सरकार, 28 राज्य सरकारे, 2 केंद्रशासित प्रदेश सरकारे, 6 केंद्रशासित प्रदेश, सुमारे 2.5 लाख स्थानिक स्वराज्य संस्था, 30-31 लाख निवडून आलेले प्रतिनिधी, 6.40 लाख गावे आणि त्यांच्या ग्रामपंचायती, जिल्हा पंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका मिळून आपली प्रशासकीय रचना आहे. जोपर्यंत देशाच्या पंतप्रधानांची संपूर्ण सरकारी दृष्टीकोन आणि टीम इंडिया ही संकल्पना तळागाळापर्यंत राबवली जात नाही तोपर्यंत भारताचा विकास शक्य नाही, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विचारसरणीच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशाला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि टीम इंडियाचे स्वप्न साकार केले आहे, असे शाह म्हणाले.
2014 पूर्वी, ज्यांचे कोणत्याही बँकेत खाते नव्हते आणि जे देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग नव्हते, अशा 60 कोटी लोकांचा कोणीही कधीही विचार केला नाही, असं अमित शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात प्रत्येक कुटुंबाला बँक खात्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे काम मोदींनी केले आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना प्रेरणा दिली, असंही केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. 5 वर्षांनंतर भारतात लॉजिस्टिक खर्च सध्याच्या 13 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांवर येईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पायाभूत सुविधांमध्ये सुमारे 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासनाच्या मूळ तत्त्वांची निश्चयाने तळागाळात अंमलबजावणी केली आणि अनेक नवीन धोरणे आणली आहेत. दीर्घकालीन आणि दूरदर्शी धोरणांशिवाय विकास शक्य नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कधीही जनतेला आणि व्होट बँकेला आवडणारे निर्णय घेतले नाहीत, तर जनतेच्या भल्यासाठी असे निर्णय घेतले, असं शाह यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशाचे दरडोई उत्पन्न रु. 68,000, रुपये होते, जे आज 1.72 लाख रुपये झालं आहे.

2014 मध्ये जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा 2.60 टक्के होता, जो 31 मार्च 2022 पर्यंत 3.40 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, 2014 मध्ये जागतिक एफडीआय प्रवाहात देशाचा वाटा 2.10 टक्के होता जो वाढला आहे. 2022 मध्ये तो 6.70 टक्क्यांवर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कठोर निर्णय, अचूक धोरणे तयार करणे, त्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराचा पूर्णपणे नायनाट करणे, या 4 आधारस्तंभांवर अर्थव्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, असंही शाह म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय उद्योगाने आपली व्याप्ती वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विचारविनिमय करून आखलेल्या अचूक धोरणांमुळे भारताची प्रगतीच्या मार्गावरून वाटचाल सुरू आहे, असे अमित शाह म्हणाले. आमच्या विचारधारणेने भारताला सुरक्षित केले आहे, आमच्या संवेदनशील योजनांनी भारताचा विकास सर्वसमावेशक बनवला आहे आणि आम्ही आमच्या कामगिरीने जगाला आश्चर्यचकित केले आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून 2022 मध्ये देशात एकूण 8840 कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत, ज्यामध्ये यूपीआयचा (UPI) वाटा 52 टक्के आहे आणि त्याची एकूण किंमत 126 लाख कोटी रुपये आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, भारतातील 99 टक्के गावांपर्यंत वीज पोहोचली आहे, देशातील 1.90 लाख पंचायती भारतनेटशी जोडल्या गेल्या आहेत आणि गेल्या 6 वर्षांत 6 लाख किलोमीटरहून अधिक मार्गांवर ऑप्टिकल फायबर टाकण्यात आले आहे.2014 मध्ये 6.1 कोटी ब्रॉडबँड कनेक्शन्स होती, त्यांची संख्या सप्टेंबर 2022 मध्ये 82 कोटींवर गेली आहे,अशी माहिती शाह यांनी दिली.,

देशाचे नेतृत्व करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेली क्षमता, धैर्य आणि दूरदृष्टी आहे, त्याचा उपयोग करून देश आपल्या ध्येयपूर्तीची उद्दिष्टे गाठू शकेल,हे यावरून सिद्ध होते.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आपल्यासमोर दोन उद्दीष्टे ठेवली आहेत. पहिले म्हणजे 2047 पर्यंत भारत एक पूर्ण विकसित राष्ट्र बनले पाहिजे आणि दुसरे म्हणजे 2025 पर्यंत भारताला 5 ट्रिलियन अमेरिकेन डाॅलरची अर्थव्यवस्था बनवणे आणि ही दोन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 9 वर्षात त्याचा मजबूत पाया घातला आहे. ते म्हणाले की 2022 मधील भारतातील एकूण व्यापारी वस्तूंची निर्यात 421 अब्ज अमेरिकन डॉलर आहे, देशात 83 अब्ज अमेरिकन डॉलर्सची ($ 83एफडीआय) थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे, 70,000 पेक्षा जास्त स्टार्ट-अप आहेत; त्यापैकी 116 युनिकॉर्न आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पायाभूत सुविधांवरील खर्चावर लक्ष केंद्रित केले आहे आणि 2022-23 च्या 10 महिन्यांत जीएसटी संकलन प्रति महिना सरासरी1.49 लाख कोटी रुपये इतके आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
R.Aghor/Sonal C/Sampada/Shailesh M/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1911547)