दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांनी त्यांचे नेटवर्क बंद झाल्याच्या कोणत्याही मोठ्या घटनेबद्दल माहिती देण्याचे ट्रायचे निर्देश

Posted On: 28 MAR 2023 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मार्च 2023

तांत्रिक कारणांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे दूरसंचार नेटवर्कच्या सेवा मोठ्या प्रमाणावर बंद पडण्याच्या घटना दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे (टीएसपी) ट्रायकडे नोंदवल्या जात नाहीत असे आढळून आले आहे. मोठ्या प्रमाणावर नेटवर्क बंद पडण्याच्या या घटना दीर्घ कालावधीसाठी देशातील विशेषत: सीमा आणि डोंगराळ भागातील, प्रभावित भागात सेवेच्या उपलब्धतेवर किंवा गुणवत्तेवर विपरित परिणाम करतात.

मोठ्या प्रमाणावर नेटवर्क बंद पडण्याचे मूळ कारण समजून घेण्यासाठी आणि गरज भासल्यास सेवा प्रदात्यांना  स्थानिक प्राधिकरणांकडून मदत  मिळण्यासाठी, जिल्हा स्तरावर अशा कोणत्याही नेटवर्क बंद पडण्याची माहिती संकलित करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

वरील बाबी लक्षात घेऊन, सेवा प्रदात्याना खालील बाबींचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत:

  1. जिल्ह्यातील (केंद्र/राज्य सरकारने परिभाषित केल्यानुसार महसूल जिल्हा) दूरसंचार सेवांवर परिणाम करणाऱ्या सतत चार तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी नेटवर्क बंद पडण्याच्या सर्व प्रमुख घटना चोवीस तासांच्या आत, निर्देशामध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रारुपात कळवायच्या आहेत.
  2. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर नेटवर्क बंद असण्याचे मूळ कारण आणि सेवा पुनर्स्थापित केल्याच्या बहात्तर तासांच्या आत निर्देशामध्ये निर्दिष्ट केलेल्या स्वरूपात सुधारात्मक कारवाई करण्यात आली.

हे निर्देश तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.

 

 

 

 

R.Aghor/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911469) Visitor Counter : 178