संरक्षण मंत्रालय
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे 2022-23 या वित्तीय वर्षासाठी 224 कोटी रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश धनादेश सुपूर्द
Posted On:
27 MAR 2023 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2023
सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादनविषयक नवरत्न कंपनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीईएलने आज 27 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दुसऱ्या अंतरिम लाभांशाच्या रुपाने 224,27,53,160.40/ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. बीईएलने त्यांच्या भागधारकांना आर्थिक वर्ष 2022–23 साठी दुसरा अंतरिम लाभांश 60% टक्के इतका (रु. 0.60/- प्रति समभाग) घोषित केला आहे.
अंतरिम लाभांश देण्याचे बीईएलचे हे सलग 20 वे वर्ष आहे. बीईएलने 2022–23 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या भागधारकांना फेब्रुवारी 2023 मध्ये प्रथम अंतरिम लाभांश (रु. 0.60/- प्रति समभाग ) म्हणून 60% टक्के दिले आहेत. कंपनीने आपल्या पेडअप भांडवलावर 2021–22 या आर्थिक वर्षात एकूण 450% लाभांश प्रदान केला आहे.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1911263)
Visitor Counter : 178