संरक्षण मंत्रालय

संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष (आयडीईएक्स) योजना

Posted On: 27 MAR 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2023

 

आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी एमएसएमई, स्टार्ट-अप, स्वतंत्र नवोन्मेषक, संशोधन आणि विकास संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह उद्योगांना संलग्न करून, संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी  (आयडीईएक्स) सरकारने नवोन्मेष उपक्रम सुरु केले आहेत. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत, 139 आयडीईएक्स विजेत्यांना अनुदान/निधी प्रदान करण्यात आला आहे. सेवांसाठी, यशस्वी चाचण्यांनंतर, तीन आयडीईएक्स विजेत्यांकडे पुरवठा करण्यासाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. शिवाय, मंत्रालयाने आणखी 13 आयडीईएक्स उत्पादनांसाठी आवश्यकतेनुसार स्वीकृती  (एओएन ) हे तत्व अवलंबले आहे.

संपूर्णपणे पोषक वातावरण तयार करण्यासाठी,विविध सरकारी संस्थांकडे उपलब्ध चाचणी सुविधा/पायाभूत सुविधांची  सुलभ आणि जलद उपलब्धता, सुरळीत कार्यपद्धती वापरून सह-निर्मिती आणि सह-नवोन्मेष आणि किमान कागदपत्रे या सुविधांसाठी आयडीईएक्सचे  19 संबंधित  भागीदार इनक्यूबेटर्सद्वारे, आयडीईएक्स विजेत्यांना तांत्रिक प्रोत्साहन देतात. सेवा पुरवठादारांकडे  त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तांत्रिक बाजू भक्कम आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आयडीईएक्स ने कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड रिलिटी (एआर) /व्हर्च्युअल रिलिटी (व्हीआर), स्वायत्त/मानवरहित उपाय, स्टेल्थ, कार्यक्षेत्र जागरूकता, सुरक्षित संपर्क, सिम्युलेशन, दळणवळण, प्रेडिक्टिव मेंटेनन्स, स्पेस, सायबर सुरक्षा इत्यादीसारखे आघाडीचे तंत्रज्ञान /कार्यक्षेत्र यासाठी  उत्तेजन देण्याच्या अनुषंगाने उपक्रम सुरु केले आहेत. 

राज्यसभेत आज संरक्षण राज्यमंत्री  अजय भट्ट यांनी अबीर रंजन बिस्वास यांना दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911154) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Telugu