गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटकातील रायचूर इथे 4500 कोटी रुपयांच्या 236 विकास कामांचं केलं उद्घाटन आणि पायाभरणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली फक्त त्यांचं सरकारच कर्नाटकची भरभराट करु शकतं, मोदी सरकारनं देशातील कोट्यवधी जनतेच्या कल्याणासाठी अनेक कामं केली आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्ध्व भद्रा योजनेसाठी 5300 कोटी रुपये आणि उर्ध्व कृष्णा योजनेसाठी 5000 कोटी रुपये दिले, म्हादईचा प्रश्नही सोडवला

रायचूर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड विमानतळाचं बांधकाम सुरू झालं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कोळंबीवरील निर्यात शुल्कात कपात करून कोळंबी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून दिला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, केवळ नरेंद्र मोदीच भारताला समृद्ध आणि सुरक्षित बनवू शकतात

Posted On: 26 MAR 2023 10:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटकातील रायचूर इथे 4500 कोटी रुपयांच्या 236 विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 1400 गावे आणि 7 शहरांना जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छ पेयजलाचा पुरवठा, तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाची 105 कामे आणि कर्नाटक रस्ते विकास संस्थेची 19 कामे, अशा कामांचा या विकास कामांमध्ये समावेश आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0012EPI.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली फक्त त्यांचं सरकारच कर्नाटकची भरभराट करु शकतं, असं अमित शहा यांनी यावेळी केलेल्या भाषणात बोलताना सांगितलं. कर्नाटक मध्ये खूप विकास कामं करण्यात आली आहेत, असंही ते पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्ध्व भद्रा योजनेसाठी 5300 कोटी रुपये आणि उर्ध्व कृष्णा योजनेसाठी 5000 कोटी रुपये दिले, म्हादईचा   प्रश्नही सोडवला. त्या शिवाय, रायचूर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड विमानतळाचं बांधकामही सुरू झालं आहे, तसच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कोळंबीवरील निर्यात शुल्कात कपात करून कोळंबी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून दिला आहे, अशी माहिती सुद्धा अमित शहा यांनी यावेळी दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002SQ3Z.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, अकराव्या स्थानावरून उसळी घेत, भारत जगातील 5 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, असं शहा म्हणाले. भारत भ्रमणध्वनी संचांचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आहे, स्टार्टअप अर्थात नवउद्योग क्षेत्रात भारताचा तिसरा क्रमांक आहे आणि अपारंपरीक ऊर्जेच्या क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या सर्व कामगिरीच्या बळावरच नरेंद्र मोदी यांनी भारताला 5 ट्रिलियन अर्थात 5 लाख कोटी अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की या आधीच्या सरकारांच्या राजवटीत, सीमेपलीकडून दहशतवादी भारतात घुसून हल्ले करत असत आणि तेव्हाचं सरकार काहीही बोलत नसे, करत नसे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सर्जिकल अर्थात लक्ष्यभेदी आणि हवाई हल्ले करून या दहशतवाद्यांना ठार केलं आणि उरी तसच पुलवामा हल्ल्यांचा बदला घेतला.  केवळ नरेंद्र मोदीच भारताला समृद्ध आणि सुरक्षित बनवू शकतात, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003C6J8.jpg

देशातील कोट्यवधी जनतेच्या कल्याणासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कामं केली आहेत, असंही अमित शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर, 10 कोटी घरांमध्ये शौचालयं, प्रत्येक घरात वीज आणि प्रत्येक गरीब व्यक्तीला प्रधानमंत्री आयुष्मान योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा, अशा सुविधा पुरवल्या, असेही अमित शहा यांनी पुढे सांगितलं. 130 कोटी लोकांना कोविड 19 पासून सुरक्षित ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतालाच सुरक्षित केलं असं  शहा म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  देशातल्या कोट्यवधी गरीब लोकांना प्रत्येक महिन्यात प्रति व्यक्ती 5 किलो धान्य विनामूल्य पुरवत आहेत, अशी माहिती सुद्धा अमित शहा यांनी यावेळी दिली.

***

G.Chippalkatti/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911011) Visitor Counter : 138