राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 27 ते 28 मार्च असे दोन दिवस पश्चिम बंगालला भेट देणार
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2023 6:04PM by PIB Mumbai
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू 27 ते 28 मार्च 2023 असे दोन दिवस पश्चिम बंगालला भेट देणार आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती कोलकाता येथील नेताजी भवनला 27 मार्च 2023 रोजी भेट देतील. त्यानंतर त्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहण्यासाठी जोरसांको ठाकूरबारी या रवींद्रनाथ टागोरांच्या घराला भेट देतील. त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती, कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियम या बंदिस्त क्रीडागारात त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील.
राष्ट्रपती 28 मार्च 2023 रोजी बेलूर मठाला भेट देतील. यूको बँकेला 80 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने, कोलकाता इथे आयोजित समारंभातही त्या सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती त्या नंतर शांतिनिकेतनला भेट देऊन तिथे आयोजित विश्व-भारतीच्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
***
G.Chippalkatti/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1910936)
आगंतुक पटल : 208