सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज कर्नाटकमध्ये सहकार समृद्धी सौधाची केली पायाभरणी आणि बंगळूरुमध्ये कर्नाटक सरकारच्या सहकार विभागाच्या 1400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 24 MAR 2023 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज कर्नाटकमध्ये सहकार समृद्धी सौधाची पायाभरणी केली आणि बंगळूरुमध्ये कर्नाटक सरकारच्या सहकार विभागाच्या 1400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे  उद्घाटन केले. आपल्या भाषणामध्ये अमित शाह म्हणाले की सहकार समृद्धी सौध कृषीमाल विक्रीसाठी 67 एकरचे मार्केट यार्ड, बिनिपेट एपीएमसीमध्ये पुष्प उत्पादक  शेतकऱ्यांसाठी 11 कोटी रुपये खर्चाने एक बाजारपेठ, यशवंतपुरा एपीएमसीमध्ये 8 कोटी रुपये खर्चाने बहुस्तरीय कार पार्किंग यांसारखे प्रकल्प उभारले जात आहेत.  कर्नाटक दूध महासंघाच्या विविध इमारतींचे देखील आज उद्घाटन झाले असे त्यांनी सांगितले. 430 कोटी रुपये खर्चाचा 100 मेगावॉटचा ग्रुप कॅप्टिव्ह सौर ऊर्जा प्रकल्प, चिकबल्लारपूर आणि प्रियापत्न येथे अनुक्रमे 140 आणि 50 कोटी रुपये खर्चाचे गुरांच्या खाद्याचे प्रकल्प, 95 कोटी रुपये खर्चाचा पॅकेजिंग प्लांट आणि बेळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारले जात आहे. यासोबतच नवा ऑक्सिजन प्लांट, बंगलोर विकास प्राधिकरणाची 238 कोटी रुपये खर्चाची भुयारी सांडपाणी निःसारण सुविधा, बंगळूरुच्या बाणशंकरी तालुक्यात 31 कोटी रुपये खर्चाने रस्त्यांची उभारणी आणि यशवंतपुरा येथे 128 कोटी रुपये खर्चाचे इतर विकास प्रकल्प उभारले जात आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत कुम्बालगोडू, रामोहळ्ळी, जलहळ्ळी, चिकनाहळ्ळी, चुंचनाकुप्पे आणि कागलाहळ्ळी यांसारख्या पंचायतींमध्ये 182 कोटी रुपये खर्चाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असे शाह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बियाणे, सेंद्रीय उत्पादने आणि निर्यातीसाठी बहु-राज्य सहकारी सोसायट्यांची स्थापना करण्यात आली आहे, असे अमित शाह म्हणाले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रात अनेक उपक्रम सुरू केले आहेत आणि कर्नाटक सरकार ते पुढे घेऊन जात आहे, असे शाह यांनी सांगितले.  

 

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1910581) आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Kannada