कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्रिमंडळाची 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमीभावाला मंजुरी
प्रविष्टि तिथि:
24 MAR 2023 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमीभावाला मंजुरी दिली आहे.
कृषी खर्च आणि दर आयोगाच्या(CACP) शिफारशीवरून ही मंजुरी देण्यात आली आहे. 2023-24 या हंगामासाठी कच्च्या तागाचा ( टीडी-3 यापूर्वीच्या टीडी-5 स्तराइतका) हमीभाव प्रतिक्विंटल 5050 रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामुळे उत्पादन खर्चाच्या अखिल भारतीय भारित सरासरीच्या 63.20 टक्के परतावा सुनिश्चित होईल. 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाचा जाहीर करण्यात आलेला हमीभाव 2018-19च्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केल्यानुसार अखिल भारतीय भारित सरासरीच्या किमान दीडपट हमीभाव निश्चित करण्याच्या सिद्धांताला अनुसरून आहे. यामुळे नफ्याचे प्रमाण किमान 50 टक्के सुनिश्चित होते. ताग उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा सुनिश्चित करण्यासाठी आणि दर्जेदार तागाचे उत्पादन करणाऱ्यांना प्रोत्साहननिधी मिळवून देण्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल आहे. अशा प्रकारच्या परिचालनांमध्ये भारतीय ताग महामंडळ केंद्र सरकारची नोडल संस्था म्हणून काम करेल आणि दरांच्या पाठबळाच्या परिचालनाचे काम हाती घेईल आणि यामध्ये काही नुकसान झाल्यास केंद्र सरकार त्याची संपूर्ण भरपाई देईल.
G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1910562)
आगंतुक पटल : 222