वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम मित्र अंतर्गत प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करताना पीएम गतिशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल


भारत हा जगातील 5 व्या क्रमांकाचा तांत्रिक कापड उत्पादक देश आहे: गोयल

पायाभूत सुविधा प्रकल्पांना जलदगतीने मंजुरी मिळून ते तितक्याचं वेगाने पूर्ण होत असल्याबद्दल गोयल यांनी मानले पीएम गतिशक्तीचे आभार

Posted On: 24 MAR 2023 8:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2023

प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपरेल (पीएम मित्र) कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारला प्राप्त झालेल्या विविध प्रस्तावांचे मूल्यमापन करताना पीएम गतिशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, यामुळे निवडलेल्या आणि विजेत्या स्थानांचे प्रमाणीकरण करण्यात मदत झाली. हा भारतातील तंत्रज्ञानाधारित पारदर्शी कारभाराचा दाखला आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. दिल्लीत जिओ टेक्सटाइलवरील राष्ट्रीय परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते.

माननीय पंतप्रधानांच्या पाच एफ व्हिजनच्या अनुषंगाने: फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन, पीएम मित्र योजनेंतर्गत तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सात महा वस्त्रोद्योग उद्याने उभारण्याची घोषणा केली आहे. मी सर्व विजेत्या राज्यांचे अभिनंदन करतो, , असे गोयल यांनी सांगितले.

तांत्रिक कापड क्षेत्रात जवळपास 22 अब्ज डॉलर बाजारपेठेसह भारत हा जगात 5वा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. 2047 पर्यंत भारताचे राष्ट्रराज्य 100 वर्षांचे झाल्यावर या क्षेत्रातील बाजार मूल्य 300 अब्ज डॉलपपर्यंत वाढवण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

जिओ-टेक्सटाइल्सच्या वाढत्या जागतिक मागणीवर त्यांनी भर दिला.  जिओ टेक्सटाइल आणि टेक्निकल टेक्सटाईल क्षेत्रातील बाजारपेठेची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले जाईल, असा आपल्याला विश्वास आहे असे ते म्हणाले.

2021 मध्ये उद्घाटन झालेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय योजनेसह आजची परिषद विविध औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांना अनेक पद्धतींनी जोडण्यासाठी आणि त्यांना शेवटच्या टप्प्यावर पायाभूत सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे, असे त्यांनी सांगितले.  त्यांनी पीएम गतिशक्ती प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांना जलदगतीने मंजूरी मिळत असल्यामुळे ते मार्गी लागत आहेत, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांगीण नियोजनामुळे अधिक न्यायपूर्ण आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अंमलबजावणी होईल. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान खर्च आणि वेळेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताला जी20 चे अध्यक्षपद मिळाले  असताना ही परिषद होत आहे हे यथोचित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.. तांत्रिक भू-वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी आजची परिषद मैलाचा दगड ठरावी असेही ते म्हणाले.

 

G.Chippalkatti/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1910501) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri