प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर परस्पर हितसंबंधांच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जी 20 देशांच्या मुख्य विज्ञान सल्लागारांची (जी 20- सीएसएआर) रामनगर, उत्तराखंड येथे 28-30 मार्चदरम्यान परिषद

Posted On: 24 MAR 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2023

केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने आगामी मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज (जी 20- सीएसएआर) परिषदेसाठी प्रारंभिक कार्यक्रम आयोजित केला.यावेळी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय कुमार सूद यांनी प्रास्ताविक केले आणि या गोलमेज परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, मुख्य विज्ञान सल्लागार (किंवा त्यांचे समतुल्य) पुराव्यावर आधारित विज्ञान सल्ला देऊन धोरण निवडींना चालना देतात. एकंदर प्रशासनाच्या चौकटीबाहेर  आगळ्या वेगळ्या स्थानावर  राहून हे सल्लागार कार्यरत आहेत. विज्ञान सल्ला यंत्रणेचे व्यापक स्वरूप विविध क्षेत्रांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी आणि काही जटिल, बहुआयामी आणि ट्रान्सडिसिप्लिनरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्प्रेरक साधन म्हणून सक्षम करणे असे आहे. या जाणीवेतून आणि प्रेरणेने जी 20- सीएसएआर हा भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक जागतिक विज्ञान सल्ल्यासाठी विषयपत्रिका तयार करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयातील वैज्ञानिक सचिव डॉ. परविंदर मैनी, यांनी सीएसएआर आणि प्रस्तावित उपक्रमांवर सादरीकरण केले. त्यांनी 28-30 मार्च 2023 दरम्यान रामनगर, उत्तराखंड येथे होणाऱ्या पहिल्या परिषदेची एकूण रूपरेषा सांगितली.

आगामी काळात पुढील विषयांवर चर्चा केली जाईल असे मैनी यांनी सांगितले:

1. उत्तम रोग नियंत्रण आणि साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी तयारी करतानाच्या संधी

2. विद्वत्तापूर्ण वैज्ञानिक ज्ञानाच्या उपलब्धतेचा विस्तार करण्यासाठी जागतिक प्रयत्नांचा समन्वय साधणे

3. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विविधता, समानता, समावेश आणि प्रवेशयोग्यता

4. सर्वसमावेशक, सतत आणि कृती-केंद्रित जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण संवादासाठी एक संस्थात्मक यंत्रणा

सीएसएआर हा प्रथमच होत असलेला अनोखा उपक्रम आहे. त्यात निश्चित केलेले प्राधान्यक्रम सार्वत्रिक स्वरूपाचे आहेत आणि ते एक विश्व एक कुटुंब एक भविष्य या भारताच्या जी 20 संकल्पनेअंतर्गत येतात असे जी 20 सचिवालयाचे संयुक्त सचिव नागराज नायडू काकनूर म्हणाले. चर्चेच्या फलनिष्पत्तीविषयी जी 20 देशांच्या नेत्यांना सांगितले जातील आणि 18 व्या जी 20 राष्ट्रप्रमुख आणि सरकारी शिखर परिषदेत त्याचे प्रतिबिंब दिसेल यावर त्यांनी भर दिला.

जी 20- सीएसएआर हा भारताच्या जी 20-अध्यक्षपदा अंतर्गत सरकार ते सरकार स्तरावरील उपक्रम आहे. जी20 सदस्य देशांचे मुख्य विज्ञान सल्लागार आणि त्यांचे समतुल्य, तसेच आमंत्रित देशांना एकत्र आणणे, काही सामान्य जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण समस्यांवर विचारविनिमय करणे आणि सहयोगात्मक फ्रेमवर्क विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे . हा उपक्रम प्रभावी आणि सुसंगत जागतिक विज्ञान सल्ला यंत्रणा स्थापन करण्यात मदत करेल.

For details, please visit:  https://g20csar.org/

To watch the curtain raiser event and detailed press briefing, please visit:  https://www.youtube.com/live/rn80T3PoZMU?feature=share

 

 

 

 

G.Chippalkatti/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910411) Visitor Counter : 219


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu