संरक्षण मंत्रालय

निवृत्त सैनिक सहाय्यक आरोग्य योजना

Posted On: 24 MAR 2023 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2023

निवृत्त सैनिक सहाय्यक आरोग्य योजना 2003 एप्रिलमध्ये लागू केली गेली आहे. निवृत्त सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. भारतात या योजनेखाली 30 स्थानिक केंद्रे, 433 पॉली क्लीनिक आहेत. यामध्ये 3,158 वैद्यकीय सेवा पॅनेल आहेत आणि नेपाळमधील सहा केंद्रे आहेत. याचा लाभ 55 लाख जणांना  मिळतो. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेनुसार याचा आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनेप्रमाणेच आणि  दरांनुसार कॅशलेस आणि कॅप्लेस आरोग्य सेवा पुरवता येत आहेत.

संरक्षक खात्याचे लेखा परीक्षक नियंत्रकांकडून निवृत्ती वेतन येणारे सर्व निवृत्त सैनिक या योजनेला पात्र आहेत. त्यामध्ये अपंगत्व आलेले, कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि अवलंबून असणारे हे सुद्धा सभासदस्यत्वाला पात्र आहेत.

एक एप्रिल 2003 किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे आणि आधी निवृत्त झालेल्यांना सदस्यत्व घेणे ऐच्छिक आहे.

काही वर्षापासून निवृत्त सैनिक आरोग्य सेवेचे लाभ प्रादेशिक सैन्य (TA), संरक्षण सुरक्षा कॉर्प्स (DSC), भारतीय तटरक्षक दल (ICG), लष्करी परिचारक सेवा (MNS), विशेष फ्रंटियर फोर्स (SFF), नेपाळ निवासी यां संस्थांमधील निवृत्ती वेतनधारकांपर्यंत तसेच गोरखा (NDG), पूर्णवेळ राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी, पात्र लष्करी टपाल सेवा (APS) निवृत्तीवेतनधारक, आसाम रायफल्स पेन्शनधारक, दुसरे महायुद्ध  मध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ, शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी (SSCOs), आपत्कालीन आयोग अधिकारी (ECOs) आणि निवृत्ती वयाआधी सेवानिवृत्ती घेतलेले यांच्या पर्यंतही नेण्यात आले आहेत.  

ECHS सदस्य होण्यासाठी सैनिकाला 30हजार ते अधिकाऱ्यांना एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत  योगदान द्यावे लागते. एक जानेवारी 1996 पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्त सेना कर्मचाऱ्यांना, युद्धात पती गमावलेल्या महिलांना आणि युद्धात अपंगत्व आलेल्यांना याशिवाय देशांतर्गत संरक्षण कर्तव्य निभावताना अपंगत्व आलेल्यांना ह्या योगदान निधीतून सवलत देण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांत 3,35,62,481 लाभार्थ्यांना ECHS च्या माध्यमातून सेवा मिळवली आहे.

S No

Calendar Year

Number of Beneficiaries Footfall

(i)

2020

58,80,023

(ii)

2021

1,23,81,583

(iii)

2022

1,53,00,875

गेल्या तीन  आर्थिक वर्षात या योजनेवर खर्च झालेली रक्कम खालील दिली आहे :

FY

Expenditure in              Rs. Crores

2020-21

4579.63

2021-22

4864.66

2022-23

(upto 15.03.2023)

4897.64

या योजनेअंतर्गत पॅनलवर असणारी देशभरातील रुग्णालये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश निहाय तसेच आंध्र प्रदेश सह जिल्हा निहाय रुग्णालयांचे तपशील खालील प्रमाणे आहेत :

S No

State/UT

Number of Empanelled Medical Facilities

1.

Andhra Pradesh

67*

2.

Assam

22

3.

Bihar

40

4.

Chandigarh

39

5.

Chhattisgarh

16

6.

Delhi

274

7.

Goa

04

8.

Gujarat

72

9.

Haryana

368

10.

Himachal Pradesh

50

11.

Jammu

25

12.

Jharkhand

23

13.

Karnataka

133

14.

Kerala

158

15.

Madhya Pradesh

97

16.

Maharashtra

364

17.

Manipur

03

18.

Meghalaya

04

19

Mizoram

05

20.

Nagaland

01

21.

Nepal

16

22.

Orrisa

33

23.

Pondicherry

04

24.

Punjab

338

25.

Rajasthan

259

26.

Sikkim

01

27.

Tamil Nadu

167

28.

Telangana

39

29.

Tripura

05

30.

Uttar Pradesh

388

31.

Uttarakhand

68

32.

West Bengal

75

Total

3,158

 

*  ANDHRA PRADESH (DISTRICT WISE) BREAKDOWN:

S No

District

Number of Empanelled Medical Facilities

1.

Krishna

10

2.

Anantapuram

02

3.

Chittor

05

4.

Eluru

01

5.

West Godavari

03

6.

Guntur

10

7.

Prakashnam

01

8.

Kurnool

01

9.

Nellore

02

10.

Kadapa

02

11.

Visakhapatnam

16

12.

East Godavari

06

13.

Srikakullam

03

14.

Karimnagar

01

15.

Khamman

01

16.

Kakinada

03

Total

67

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी एम व्ही सत्यनारायणा आणि श्रीमती चिंता अनुराधा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिली.

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910355) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Manipuri , Tamil