वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
युएलआयपी-युलिप पोर्टल डेटा रिक्वेस्ट प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक करून वाहतूक प्रक्षेत्राला सहाय्यभूत ठरणार
Posted On:
24 MAR 2023 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2023
'नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी (एनएलपी) चा एक भाग म्हणून वाहतूक विषयक एकत्रित डिजिटल मंचाचे म्हणजे युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्मचे (युएलआयपी-युलिप) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी उद्घाटन केले. डेटा रिक्वेस्ट प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक बनविणारे एक समर्पित पोर्टल युएलआयपीमध्ये आहे. या पोर्टलमुळे भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राला माहितीवर आधारित दृश्यमानता आणि पारदर्शकता मिळते. “https://www.goulip.in” द्वारे या पोर्टलवर प्रवेश करता येतो. युएलआयपी ला उद्योग क्षेत्रातील कंपन्यांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्या सहा महिन्यातच या पोर्टलवर 400 हून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली. डेटा सेटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 68 कंपन्यांनी आधीच युएलआयपी नॉन-डिस्क्लोजर करार केले आहेत. युएलआयपीच्या अप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेसच्या (एपीआय) एकात्मतेचा फायदा घेऊन अंतिम वापरकर्त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी कंपन्यांनी 30 हून अधिक अनुप्रयोग विकसित केले आहेत. या अल्प कालावधीतच 6.5 कोटी पेक्षा जास्त एपीआय हिट्सवर आधीच प्रक्रिया केली गेली आहे. मोठे उद्योग, प्रमुख सेवा पुरवठादार तसेच नवीन स्टार्टअप्स युएलआयपीशी जोडले जाण्यास तितकेच उत्सुक आहेत.
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआटी)च्या लॉजिस्टिक विभागाच्या विशेष सचिव, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेट कॉर्पोरेशन (एनआयसीडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच एनआयसीडीसी लॉजिस्टिक्स डेटा सर्विसेस (एनएलडीएसएल)च्या अध्यक्ष सुमिता डावरा म्हणाल्या, “युलिपमुळे निश्चितपणे पारदर्शकता, कार्यक्षमता वाढवतानाच एकूण लॉजिस्टिक खर्च कमी होऊ शकतो. नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी द्वारे प्रधानमंत्री गतिशक्तीच्या पूर्ततेसाठी युलिप आपल्या नवीन आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने भारतीय लॉजिस्टिक क्षेत्रात योगदान देत राहील.” कोळसा, सिमेंट, खते, अन्नधान्य यासारख्या विशिष्ट क्षेत्रांच्या लॉजिस्टिकसाठी युलिपने आता डेटा आवश्यकता पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
मारुती सुझुकी, डीएचएल, सेफएक्सप्रेस, अल्ट्राटेक, टीसीआयएल, जिंदाल स्टेनलेस, टाटा स्टील, येस बँक, बॉश, टोटल ग्रुप इत्यादी प्रमुख उद्योगातील कंपन्यांनी त्यांची लॉजिस्टिक माहिती अद्ययावत करण्यासाठी युलिपचा आधार घेतला आहे. त्याचा त्यांना आणि त्यांच्या भागधारकांना फायदा होत आहे.
G.Chippalkatti/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1910335)
Visitor Counter : 231