संरक्षण मंत्रालय
संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर
Posted On:
24 MAR 2023 3:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2023
भारत सरकारने आपल्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात देशात सर्वांगीण संरक्षण उत्पादन परिसंस्था विकसित करण्यासाठी दोन संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर (DICs) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. अलिगढ, आग्रा, झांसी, कानपूर, चित्रकूट आणि लखनौ या सहा नोड्ससह उत्तर प्रदेशमध्ये एक कॉरिडॉर स्थापन करण्यात आला आहे आणि दुसरा तामिळनाडूमध्ये चेन्नई, होसूर, कोईम्बतूर, सेलम आणि तिरुचिरापल्ली या पाच नोड्ससह स्थापन करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, 12,191 कोटी रुपयांची संभाव्य गुंतवणूक असलेल्या उद्योग/ संस्थांबरोबर 108 सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर (UPDIC) मध्ये यापूर्वीच 2,445 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय, तामिळनाडू सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, 53 उद्योगांसह 11,794 कोटी रुपयांच्या संभाव्य गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार इत्यादीद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. तामिळनाडू संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर (TNDIC) मध्ये 3,894 कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच झाली आहे. देशात कोणताही नवीन संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत अण्णासाहेब शंकर जोल्ले यांनी विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.
G.Chippalkatti/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910334)
Visitor Counter : 175