पंतप्रधान कार्यालय

सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 23 MAR 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  मार्च 2023

 

उत्तर प्रदेशात कौशांबी येथे  वैद्यकीय व्हॅनचा वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील खासदार विनोद सोनकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये वैद्यकीय व्हॅनच्या सहाय्याने 2,47,500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी झाल्याची  आणि या ठिकाणी 25000 पेक्षा अधिक लोकांनी विविध सरकारी योजनांचे लाभार्थी म्हणून नावनोंदणी केली असल्याची माहिती दिली आहे, या संदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले;

अभूतपूर्व प्रयत्न! जनसेवेशी संबंधित अशा प्रकारचे अभियान, विकासाला नवी गती देणारे आहे.

 

 

 

 

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910196) Visitor Counter : 122