आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड 19 अद्ययावत माहिती

Posted On: 23 MAR 2023 10:10AM by PIB Mumbai

भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 65 लाखांहून अधिक मात्रा (95.20 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात 7,530 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 7,605 इतकी आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.02% इतके आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79% इतका आहे.

गेल्या 24 तासात 718 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,41,60,997

गेल्या 24 तासात देशभरात 1,300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.46% इतका आहे

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.08% इतका आहे.

देशभरात आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.06 कोटी कोविड चाचण्या केल्या गेल्या. गेल्या 24 तासात 89,078 कोविड चाचण्या झाल्या.

 

****

S.Thakur/Vijaya S./CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1909838) Visitor Counter : 224