गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
जागतिक जल दिन 2023 मध्ये, लहान शहरांमधील वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनाला गती देण्यावर विशेष भर
Posted On:
22 MAR 2023 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
जागतिक जल दिनानिमित्त गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने ‘छोट्या शहरांमधील वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. या वर्षीच्या, “वेगाने बदल घडवणे”, या संकल्पनेवर आधारित या वेबिनार मध्ये, जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी अधिक गुंतवणूक, नवोन्मेष आणि प्रशासनाची गरज अधोरेखित करण्यात आली.
स्वच्छतेबाबतच्या चर्चा सत्रात, लहान शहरांना आपल्याकडील वापरलेल्या पाण्याच्या प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि अंमलबजावणीचा आराखडा बनवताना चक्राकार अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन अंगीकारून, उत्तम कार्यपद्धती कशी प्रदर्शित करता येईल, यावर भर देण्यात आला.
इंदूर, सुरत, नवी दिल्ली नगर परिषद (NDMC), तिरुपती, चंदीगड, नवी मुंबई, विजयवाडा, हैदराबाद, ग्रेटर विशाखापट्टणम, कराड, पाचगणी, भोपाळ, बारामती आणि म्हैसूर- ही शहरे वॉटर+ प्रमाणित आहेत, हे त्यांच्यामधील साम्य आहे. ही 14 शहरे शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनाची सर्वोच्च मानके साध्य करण्यामध्ये आघाडीवर आहेत. या शहरांनी केवळ वापरलेले पाणी गोळा करून त्यावर सुरक्षितपणे प्रक्रिया केली नाही, तर वापरलेल्या पाण्यावरील दुय्यम/तृतीय स्तरावरील प्रक्रीये नंतर त्याचा पुनर्वापर करण्यामध्येही ती सक्षम बनली आहेत.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909673)
Visitor Counter : 178