कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
22 MAR 2023 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो. जम्मू आणि काश्मीरचा असल्यामुळे ते खात्रीने सांगू शकतात की दहशतवादी पळून जात आहेत आणि दहशतवाद अंतिम टप्प्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

शहीद-ए-आझम भगतसिंह , राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित “बसंती चोला दिवस” कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह आज बोलत होते. अंतर्गत विरोधामुळे अखेर भारतातून बाहेर पडावे लागल्याने ब्रिटीशांची दहशतवादी राजवट संपुष्टात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भगतसिंह हे 20 व्या शतकातील पहिले मानवाधिकार कार्यकर्ते होते, तेव्हा मानवी हक्कांची संकल्पना अस्तित्वात देखील आली नव्हती, ते काळाच्याही खूप पुढे होते, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. हुतात्मा आणि स्वातंत्र्यसैनिक याशिवाय भगतसिंह हे एक महान विचारवंत आणि तत्त्वज्ञ देखील होते आणि त्यांच्या लेखनात आणि विचारांमध्ये गांधी आणि कार्ल मार्क्स या दोघांचेही मिश्रण होते, असे त्यांनी सांगितले.

एसबीएस फाउंडेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहीद भगतसिंह सेवा दलाच्या योगदानाच्या सामाजिक कार्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी कौतुक केले. कोविड महामारीच्या काळात प्रत्यक्ष काम करताना दिसणारी एसबीएस ही एकमेव संस्था होती , हे त्यांनी अधोरेखित केले.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1909645)
Visitor Counter : 189