नागरी उड्डाण मंत्रालय
विमान वाहतूक क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि विमानतळांवरील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने हाती घेतलेले उपक्रम
Posted On:
22 MAR 2023 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राने अलिकडच्या वर्षांत झपाट्याने वाढ अनुभवल्यामुळे विमानतळांवरील कार्बन उत्सर्जनात वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हवाई वाहतूक क्षेत्रातील शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि विमानतळावरील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
भागधारकांना जागरूक करण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने हाती घेतलेले उपक्रम :
विमान वाहतूक क्षेत्रातील शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि विमानतळांवरील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, विमान वाहतूक मंत्रालयाने खालील उपाययोजना केल्या आहेत:
- भारतीय विमानतळांचे कार्बन लेखा आणि नोंद आराखडा प्रमाणित करण्यासाठी तसेच हवामान बदलांवर मात करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने माहिती सामायिकरण सत्रांचे आयोजन केले होते.
- कार्बन प्रभावशून्यता आणि निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने कार्यरत असून यामध्ये 100% हरित ऊर्जेचा वापर समाविष्ट आहे.
- कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपायांचा तसेच कार्बन व्यवस्थापन योजनांचा महत्वाच्या टप्प्यांसह अवलंब
- विमानतळ शुल्क निर्धारणासाठी हरित ऊर्जा वापराशी संबंधित खर्चाचा विचार करण्याचा विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाला सल्ला
कामगिरी :
- देशातील दिल्ली आणि मुंबई या दोन प्रमुख विमानतळांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेची 4+ कार्बन मान्यता प्रमाणनाची सर्वोच्च पातळी प्राप्त केली आहे. आजपर्यंत, आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये केवळ तीन विमानतळांनी ही कामगिरी केली आहे.
- हैदराबाद आणि बंगळुरूनेही कार्बन प्रभावशून्यता (पातळी 3+) होण्याचा दर्जा प्राप्त केला आहे.
- भारतीय विमान प्राधिकरणाने यापूर्वीच विविध विमानतळांवर 54 MWp पेक्षा जास्त क्षमतेचे सौर ऊर्जा संयंत्र स्थापित केले आहेत. भारतीय विमान प्राधिकरणा खुला प्रवेश आणि हरित ऊर्जा शुल्काच्या माध्यमातून सौर ऊर्जेचे सुमारे 53 दशलक्ष युनिट्स देखील खरेदी करत आहे.
- बहुतांश विमानतळांनी 2024 पर्यंत हरित ऊर्जेचा 100% वापर आणि 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- मुंबई, कोचीन आणि भारतीय विमान प्राधिकरणाचे 25 विमानतळ 100% हरित ऊर्जा वापरत आहेत. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे कोचीन विमानतळ हे जगातील पहिले हरित विमानतळ आहे
- कार्बन प्रभावशून्यतेच्या दिशेने जागरूक करण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रकांसाठी प्रोत्साहन प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्यात आले आहे.
IDENTICAL PHOTO
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909556)
Visitor Counter : 232