राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरोज आणि सजिबू चैरोबा यांच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा

Posted On: 21 MAR 2023 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरोज आणि सजिबू चैरोबा या सणांच्या  पूर्वसंध्येला नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरोज आणि सजिबू चैरोबा या सणांच्या  पुर्वसंध्येला  सर्व नागरिकांना शुभेच्छा देते.

भारतीय नववर्षाच आरंभ होताना साजरे होणारे हे सण पुरातन  आपल्या विश्वासाचे प्रतीक आणि संस्कृतीचे वाहक आहेत. हे आनंद घेऊन येणारे उत्सव सामाजिक बंध आणि बंधुत्व दृढ  करतात. या उत्सवांमधून आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो,

हे सण भारतातील वेगवेगळ्या समाजातील प्रेमाचे बंध घट्ट करोत तसेच  सर्वांना  सुसंवाद, आपुलकी , आनंद आणि समृद्धी प्रदान करोत.

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1909294) Visitor Counter : 139


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri