आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राष्ट्रीय धोरणात्मक योजना (NSP)आणि कुष्ठरोगासाठीचा पथदर्शक आराखडा (2023-27), 2027 पर्यंत कुष्ठरोगाच्या शून्य प्रसाराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उपयोगी ठरणार

Posted On: 21 MAR 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2023

भारत सरकारने 30 जानेवारी 2023 रोजी कुष्ठरोगासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (NSP) आणि पथदर्शक आराखडा (2023-27) लागू केला आहे. 2027 सालापर्यंत, म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG) 3.3 च्या तीन वर्षे आधी कुष्ठरोगाच्या शून्य प्रसाराचे उद्दिष्ट गाठणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची  धोरणे, वर्षनिहाय उद्दिष्टे, सार्वजनिक आरोग्याबाबतचे दृष्टीकोन आणि एकूण तांत्रिक मार्गदर्शन, याचा राष्ट्रीय धोरणात्मक योजना आणि पथदर्शक आराखड्यामध्ये समावेश आहे. कुष्ठारोगाशी निगडीत कलंक आणि भेदभाव नाहीसा करणे, रोग-निदान लवकर करायला प्रोत्साहन देणे, प्रोफिलॅक्सिस (कुष्ठरोग पश्चात प्रसार) मुळे होणारा रोगाचा प्रसार रोखणे आणि कुष्ठरोगाच्या प्रकरणांची नोंद करण्यासाठी वेब आधारित माहिती पोर्टल (Nikusth 2.0) सुरु करणे, यावर हे धोरण आणि पथदर्शक आराखडा भर देणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर रोग निर्मूलनाचा दर्जा प्राप्त केल्यानंतर, ग्रेड 2 अपंगत्त्व टाळण्यासाठी आणि कुष्ठरुग्णांना मोफत उपचार सुनिश्चित करण्यासाठी या रोगाच्या प्रकरणांची लवकर नोंद व्हायला हवी, यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाने (एनएलईपी) अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील काही जिल्ह्यांमध्ये कुष्ठारोगाचा कायम प्रादुर्भाव दिसून येतो. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत गेल्या काही वर्षांत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे, नव्याने नोंद होणार्‍या कुष्ठरुग्णांची संख्या कमी झाली आहे. 2014-15 मध्ये ही संख्या 1,25,785 होती. 2021-22 मध्ये ती कमी होऊन 75,394 वर आली. जागतिक नवीन कुष्ठरोग प्रकरणांच्या ती 53.6% इतकी होती. सध्याचा एनएलईपी राज्यवार डेटा पुढे जोडण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, 2005 मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रति 10,000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी कुष्ठरोगाच्या प्रकरणांच्या नोंदीसह, भारताने सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोगाचे निर्मुलन केले आहे.

राज्यनिहाय एनएलईपी डेटा आर्थिक वर्ष 2022-23 (जानेवारी 2023 पर्यंत

 

S.No.

State/UT

Prevalence Rate (PR)/ 10000 population

1

Andhra Pradesh

0.5

2

Arunachal Pradesh

0.1

3

Assam

0.2

4

Bihar

0.9

5

Chhattisgarh

2.3

6

Goa

0.2

7

Gujarat

0.4

8

Haryana

0.1

9

Himachal Pradesh

0.2

10

10 Jharkhand

1.4

11

11 Jammu & Kashmir

0.1

12

Karnataka

0.3

13

Kerala

0.1

2314

14 Madhya Pradesh

0.9

15

15 Maharashtra

1.2

16

16 Manipur

0.1

17

17 Meghalaya

0.0

18

18 Mizoram

0.1

19

19 Nagaland

0.1

20

20 Odisha

1.2

21

21 Punjab

0.2

22

22 Rajasthan

0.1

23

23 Sikkim

0.2

24

24 Tamil Nadu

0.3

25

25 Telangana

0.7

26

26 Tripura

0.0

27

27 Uttar Pradesh

0.4

28

28 Uttarakhand

0.3

29

29 West Bengal

0.5

30

30 A & N Islands

0.1

31

31 Chandigarh

1.4

32

32 D & N Haveli

1.0

33

33 Daman & Diu

0.1

34

34 Delhi

0.8

35

35 Lakshadweep

0.0

36

36 Ladakh

0.3

37

37 Puducherry

0.1

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1909153) Visitor Counter : 286


Read this release in: English , Manipuri , Tamil , Telugu