अर्थ मंत्रालय
राजस्थान मधील उदयपूर येथे 21 ते 23 मार्च 2023 दरम्यान दुसरी सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुप अर्थात शाश्वत वित्त कार्यगटाची (SFWG) बैठक
वर्ष 2023 साठीच्या प्राधान्य क्षेत्रांवर आणि एकत्रितपणे कामाच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी 90 हून अधिक प्रतिनिधी एकत्र येणार
Posted On:
20 MAR 2023 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2023
भारताच्या G20 अध्यक्षतेखालील दुसरी G20 सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुप अर्थात शाश्वत वित्त कार्यगटाची (SFWG) बैठक 21 ते 23 मार्च 2023 या कालावधीत राजस्थान मधील उदयपूर येथे होणार आहे. उदयपूर येथे तीन दिवस चाललेल्या या बैठकीत विविध देशांतील 90 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. G20 चे सदस्य तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांसह भारतीय राष्ट्रपतींनी आमंत्रित केलेले सदस्य वर्ष 2023 साठी मान्य केलेल्या कार्य योजना आणि प्राधान्य क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा करतील.
G20 सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुप (SFWG) ची पहिली बैठक 2-3 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुवाहाटी, आसाम येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी वर्ष 2023 मध्ये SFWG च्या कार्ययोजनेसाठी व्यापक समर्थन आणि सहकार्य दर्शविले.
दुसऱ्या G20 सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुपच्या बैठकीत ही चर्चा पुढे नेणे आणि निश्चित केलेल्या तीन प्राधान्य क्षेत्रांच्या संदर्भात मागील बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांचे पुनर्परिक्षण होणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये:
1.हवामान वित्तपुरवठ्यासाठी वेळेवर आणि पुरेशी संसाधने एकत्रित करण्यासाठी यंत्रणा उभारणे
2.शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी वित्त पुरवठा निश्चित करणे
3.शाश्वत विकासासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी इकोसिस्टमची (परिसंस्थेची) क्षमता वाढवणे.
या बैठकीच्या दरम्यान दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये
1.शाश्वत गुंतवणुकीला समर्थन देण्यासाठी नॉन-प्राइसिंग पॉलिसी लीव्हर्सवर G20 कार्यशाळा
2.शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी वित्त पुरवठा सक्षम करण्यावर G20 कार्यशाळा
या कार्यशाळांमुळे संबंधित विषयांवर तपशीलवार चर्चा आणि विविध विषयावर तज्ञांकडून तांत्रिक स्तरावरील कल्पना, अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.
शाश्वत गुंतवणुकीला समर्थन देण्यासाठी नॉन-प्राईसिंग पॉलिसी लीव्हर्सवरील G20 कार्यशाळा 21 मार्च, 2023 रोजी होईल.ही कार्यशाळा राष्ट्रीय स्तरावर परिभाषित विकास प्राधान्यक्रम समजून घेऊन आणि राष्ट्रीय परिस्थितीचा योग्य विचार करून कमीत कमी कार्बन विकास सक्षम करण्यासाठी नॉन-प्राईसिंग पॉलिसी लीव्हर्स चा प्रभाव समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. दुसरीकडे, शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी वित्त पुरवठा सक्षम करण्यासाठी 22 मार्च, 2023 रोजी G20 कार्यशाळा आयोजित केली जाईल. या कार्यशाळेच्या माध्यमातून सदस्यांमध्ये चांगली समज निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDGs) वर्धित वित्तपुरवठ्यासाठी धोरण आणि इतर शिफारशी निश्चित केल्या जातील. शाश्वत वित्त कार्य गटाची (SFWG) ही पहिलीच वेळ आहे , जिथे हवामानाशी संबंधित समस्यांच्या पलीकडे जाऊन प्रामुख्याने निसर्गाशी संबंधित डेटा आणि अहवाल आणि सामाजिक प्रभावांचा विचार करून निवडक शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी वर्धित वित्तपुरवठा सक्षम करण्यासाठी संवाद साधला जातो आहे.
दुसऱ्या G20 सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुप, अर्थात शाश्वत वित्त कार्य गट बैठकीचा प्रारंभ म्हणून भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 परिषदेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध 'जन भागीदारी' कार्यक्रम 18 ते 23 मार्च 2023 दरम्यान उदयपूरमध्ये आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी टाऊनहॉल मीटिंग, चर्चासत्र यांचा समावेश आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी आर्थिक तफावत दूर करण्यासाठी चर्चासत्र, आयआयएम उदयपूर येथे सूक्ष्म वित्त पुरवठा संबंधी भूमिका, 'ग्रीन फायनान्स-ए वे फॉरवर्ड' या विषयावर परिषद, डिजिटल बँकिंग शिक्षण कार्यक्रम, सायबर स्वच्छता आणि सायबर सुरक्षा संबंधी चर्चासत्र, G20 वित्तीय साक्षरता वॉकथॉन, वित्तीय साक्षरता शिबिर, नाणी आणि नोटा विनिमय बाबत RBI लोकपाल कार्यालय (ORBIO), जयपूर द्वारे मेळा आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
"क्लायमेट बजेट टॅगिंग (CBT) वरील अनुभव सामायिक करणे" या विषयावरील 2ऱ्या एसएफडब्ल्यूजी,(SFWG) बैठकीपूर्वी 20 मार्च 2023 रोजी एक देशांतर्गत कार्यक्रम देखील आयोजित केला गेला. या कार्यशाळेत भविष्यात अधिक चांगले नियोजन करण्यासाठी हवामानाशी संबंधित, खर्चाचा तपशील जमा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर घेतलेल्या पुढाकारांवर चर्चा केली जाईल. आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि राज्य/केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या सहभागासह भारत सरकारचे वित्त सचिव या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
या बैठकीत सहभागी होणारे प्रतिनिधी उदयपूरची समृद्ध संस्कृती आणि वारसा यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने नियोजित केलेल्या केलेल्या सहली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक पाककृतींद्वारे अनुभव घेतील.
G.Chippalkatti/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908959)
Visitor Counter : 170