खाण मंत्रालय
प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत (PMKKKY) वाटप
प्रविष्टि तिथि:
20 MAR 2023 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2023
प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजनेसाठी (PMKKKY) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांकडून अर्थसंकल्पीय तरतूद नाही. प्रधानमंत्री खानिज क्षेत्र कल्याण योजने (PMKKKY) अंतर्गत हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांना जिल्हा खनिज फाउंडेशन ट्रस्ट (DMFT) अंतर्गत जमा झालेल्या निधीतून निधी दिला जातो.
याही पुढे जाऊन, एमएमडीआर (MMDR) कायदा, 1957 च्या कलम 9B अनुसार खाण-संबंधित कामकाजामुळे प्रभावित झालेल्या कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा खनिज फाउंडेशन (DMF) ची स्थापना करणे विहित केले आहे. याचा मुख्य उद्देश हा राज्य सरकारांनी विहित केलेल्या पद्धतीनुसार व्यक्तींच्या हितासाठी आणि फायद्यासाठी आणि खाणकामामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी कार्य करणे आहे. जिल्हा खनिज फाउंडेशन(DMF) ला केंद्र सरकारने विहित केलेल्या स्वामित्व शुल्काच्या निश्चित टक्केवारीनुसार खाण परवाना धारकांकडून प्राप्त झालेल्या वैधानिक योगदानाद्वारे निधी दिला जातो.
कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1908912)
आगंतुक पटल : 183