सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सिव्हील 20 इंडिया 2023 गटाच्या कार्यकारी समितीची बैठक संपन्न

Posted On: 20 MAR 2023 1:02PM by PIB Mumbai

नागपूर दि 20 मार्च 2023

 

सिव्हील 20 इंडिया 2023 गटाच्या कार्यकारी समितीची बैठक आज  20 मार्च 2023 रोजी नागपूर इथल्या  रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये  झाली. या बैठकीला सिव्हील 20 इंडिया 2023 गटाच्या सुकाणू समितीचे (SC) सदस्य, आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे (IAC) सदस्य आणि सिव्हिल 20  इंडिया 2023 गटाचे कार्यकारी गट समन्वयक तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सिव्हिल 20 इंडिया गटसचिवालयाचे  आश्रयदाते या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीला उपस्थित असलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांमध्ये भारतातल्या अमृता विद्यापिठमचे अध्यक्ष स्वामी अमृतस्वरूपानंद, सेवानिवृत्त भारतीय राजदूत आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 चे शेर्पा विजय के. नांबियार, निवेदिता भिडे, विवेकानंद केंद्राच्या  अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे,  ब्राझीलमधील जस्टॉस(GESTOS) आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 च्या ट्रोइका सदस्य अलेस्सांद्रो नीलो,, मार्टिन रेचर्ट्स, लक्झेंबर्गच्या रायझिंग फ्लेम्सच्या सह-संस्थापक आणि संचालक आणि माजी युरोपियन कमिशनर ऑफ जस्टिस निधी गोयल, सिव्हिल 20 इंडिया 2023 शेर्पा आह मफ्तुचन आणि सिव्हिल 20 इंडिया 2023चे उप शेर्पा स्वदेश सिंग आणि किरण डीएम हे या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीला उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या ( IAC) सदस्यांमध्ये क्लिंटन हेल्थ ऍक्सेस इनिशिएटिव्हचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. अँडी कार्मोन, एशियन डेव्हलपमेंट अलायन्सचे प्रादेशिक समन्वयक (आशिया)ज्योत्स्ना मोहन,द प्रकार्सा, इंडोनेशियाचे बिन्नी बुचोरी,एड्स हेल्थकेअर फाउंडेशन AHF ग्लोबल अॅडव्होकसी आणि पॉलिसीचे संचालक गिलरमिना अलानिझ, LVIA, इटली महासचिव रिकार्डो मोरो, अबॉन्ग ब्राझील चे पेड्रो बोका, सेवा इंटरनॅशनलचे ग्लोबल समन्वयक, श्याम परांडे, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास परिषदेच्या अध्यक्ष डॉ. शशी बाला यांचा समावेश होता.  विजय नांबियार यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले आणि स्वामी अमृतस्वरूपानंद यांना उद्घाटनपर भाषण करण्यास सांगितले.

वेळ, प्रयत्न आणि परमेश्वराची आराधना या बाबी आपल्या जगण्याचे सर्वात महत्वाचे अंग असल्याचे स्वामी अमृतस्वरूपानंद यांनी सांगितलं. अध्यात्म हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे ते म्हणाले. सरकारने तळागाळातील  सर्वसामान्य माणसांच्या समस्या ऐकून घेत, त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्वामी अमृतस्वरूपानंद म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या धोरणांच्या माध्यमातून याच तत्वाचे पालन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.

भारताच्या सिव्हील 20 चे शेरपा अह माफ्तुचान यांनीही या बैठकीला संबोधीत केले. सिव्हील 20 या गटाची जी 20 चा अधिकृत संलग्नीत गट म्हणून प्रासंगिकता अजूनही कायम असल्याचे त्यांनी सांगीतले. या गटामुळे जी 20 समुहात सामाजिक मुद्द्यांचा समावेश करण्यात मदत झाली आहे, आणि अशा मुद्यांच्या बाबतीत सिव्हील 20 गटाने अधिक महत्वाकांक्षी व्हायची गरज आहे असे ते म्हणाले. सिव्हील 20 या गटाकडून तांत्रिक आणि राजकीयदृष्ट्या व्यवहार्य ठरू शकतील अशा ठोस शिफारशी यायला हव्यात अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.

या नंतर ही बैठक सर्व उपस्थितांना चर्चा आणि सहभागासाठी खुली केली गेली. त्यावेळी उपस्थितांनीही  सिव्हिल 20 इंडिया कार्यकारी गटाशी संबंधीत उपक्रम आणि संकल्पना मसुद्याविषयी त्यांच्या सूचना आणि शिफारसी मांडल्या.

***

Jaidevi PS/VPY/TP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908734) Visitor Counter : 254


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil