कृषी मंत्रालय

जागतिक श्री अन्न परिषदेचा एक भाग म्हणून भरडधान्य  आधारित स्टार्टअपसाठी ऍगलाईव्ह (AgLive ) 2023: द मिलेट चॅलेंज”, हे  सत्र आयोजित

Posted On: 18 MAR 2023 10:24PM by PIB Mumbai

 

भरडधान्यांशी संबंधित  विशिष्ट समस्या आणि आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीने आज नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक श्री अन्न  परिषदेचा एक भाग म्हणून, भरडधान्य -आधारित नवोन्मेषक /उद्योजक, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांमध्ये परस्परसंवाद वाढवून प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने,ऍगलाईव्ह (AgLive ) 2023: द मिलेट चॅलेंज, हे  सत्र आयोजित करण्यात आले होते.  निधी मिळवणे  आणि संभाव्य इन्क्युबेशन  संधी सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने तरुण उद्योजक आणि नवोन्मेषकांनी  त्यांची भरडधान्य आधारित नाविन्यपूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञान एका प्रतिष्ठित परीक्षक मंडळासमोर सादर केली, ज्यामध्ये व्यावसायिक, इनक्यूबेटर्स  आणि गुंतवणूकदार यांचा समावेश होता.

50 उमेदवारांपैकी 10 नवोन्मेषकांची निवड करण्यात आणि कल्पनांचे नावीन्य, उत्पादनांची पोहोच आणि व्याप्ती,आर्थिक स्थैर्य  यासह इतर बाबींवर त्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

यात ऍग्रोझी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड विजेते ठरले. त्यांनी  भरडधान्यामधील  आर्द्रतेचे प्रमाण अनुकूल करण्यासाठी आणि  कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट आणि उद्योजकांना एक किफायतशीर आणि शाश्वत साठवण उपाय प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

***

G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908471) Visitor Counter : 127


Read this release in: Urdu , English , Telugu , Hindi