इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
2025-2026 पर्यंत देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमता 24 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे भारताचे लक्ष्यJ, ज्यामुळे 10 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यात मदत होईल: ‘न्यू इंडिया फॉर यंग इंडिया’ सत्रात राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे प्रतिपादन
Posted On:
17 MAR 2023 5:41PM by PIB Mumbai
2025-26 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमता 24 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे नरेंद्र मोदी सरकारचे लक्ष्य आहे, ज्यामुळे 10 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होईल, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले.
‘न्यू इंडिया फॉर यंग इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून बेंगळुरूमधील ज्ञान ज्योती सभागृहात आज राजीव चंद्रशेखर यांनी शासकीय श्री कृष्ण राजेंद्र सिल्व्हर ज्युबिली टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (SKSJTI) आणि इतर महाविद्यालयांतील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना संबोधित केले.
“आज, तरुण भारतीय टेकऐड म्हणजेच तंत्रज्ञानाच्या प्रभावाने समर्थित दशकात देशाच्या प्रगतीला चालना देत आहेत. देशात 110 युनिकॉर्नसह 90,000 हून अधिक स्टार्टअप्स आहेत, ज्यामध्ये तरुण भारतीयांचा मोठा सहभाग आहे, असे त्यांनी सांगितले. या तरुणांनी आपले यश कोणत्याही संबंधांमुळे किंवा प्रसिद्ध आडनावामुळे नाही तर त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि प्रयत्नांमुळे मिळवले आहे,” असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.
आपल्या भाषणानंतर, मंत्र्यांनी एका संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सत्रात त्यांनी कौशल्य, संशोधन आणि विकास तसेच नाविन्यपूर्ण प्रणाली, उद्योजकतेच्या संधी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी अलीकडेच झालेली भेट या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
केंद्रातील सरकार आणि राज्यांतील सरकारने सामायिक उद्दिष्टांसह काम केले तर आर्थिक विकासाची गती वाढते, असे राजीव चंद्रशेखर यांनी ‘डबल इंजिन सरकार’ या संकल्पनेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
‘न्यू इंडिया फॉर यंग इंडिया’ ही राजीव चंद्रशेखर यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्यासाठी सुरू केलेली संवाद मालिका असून या संवाद मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल आणि उद्योजकीय क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा केली जाते.
***
Jaydevi/Shraddha/Parshuram
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908238)
Visitor Counter : 163