राष्ट्रपती कार्यालय
तिरुअनंतपुरम येथे नागरी स्वागत समारंभात राष्ट्रपतींची उपस्थिती; 'कुदुम्बश्री 'च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे केले उद्घाटन आणि 'उन्नती' उपक्रमाचा केला शुभारंभ
Posted On:
17 MAR 2023 3:49PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (17 मार्च, 2023) तिरुवनंतपुरम येथे केरळ सरकारने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित होत्या. या प्रसंगी राष्ट्रपतींनी ' कुदुम्बश्री ' च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले तसेच 'उन्नती' उपक्रमाचा शुभारंभ केला. कुदुम्बश्री ही जगातील सर्वात मोठ्या महिला बचतगट नेटवर्कपैकी एक संस्था आहे तर उन्नती हा अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणारा एक छत्री कार्यक्रम आहे.
केरळ हे विशेष करून निसर्ग-उपचार आणि आयुर्वेदावर आधारित आरोग्य रिसॉर्ट्सचे प्रमुख केंद्र आहे, असे मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. केरळच्या हुशार आणि मेहनती लोकांनी त्यांच्या प्रामाणिकपणा, कौशल्य या गुणांमुळे तसेच विविध उपक्रमांसाठी जागतिक स्तरावर आदर प्राप्त केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907990)
Visitor Counter : 204