पंचायती राज मंत्रालय
देशभर 250 आदर्श ग्राम पंचायत निर्माण प्रकल्पाच्या विकासाचा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी घेतला आढावा
Posted On:
17 MAR 2023 10:56AM by PIB Mumbai
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 16 मार्च 2023 रोजी एक आढावा बैठक झाली. देशभरातील 250 आदर्श ग्रामपंचायत समूह प्रकल्पाच्या विकासा संदर्भात ही आढावा बैठक होती. याप्रसंगी मंत्र्यांनी राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज संस्थेचे युवा अभ्यासक आणि 250 आदर्श ग्रामपंचायत समूहाच्या राज्य प्रकल्प संयोजकांसोबत संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातून युवा अभ्यासक (YFs) आदित्य इंगळे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत पंचायती राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार , राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज संस्थेचे संचालक जी नरेंद्र कुमार, चंद्रशेखर कुमार हे सहभागी होते. देशाच्या विविध भागातून तरुण अभ्यासक या बैठकीत सामील झाले होते.
यावेळी बोलताना गिरीराज किशोर यांनी भारतभरात 250 आदर्श ग्रामपंचायत समूह निर्माण प्रकल्पा अंतर्गत ग्रामपंचायत निर्माण करताना ग्रामपंचायतींचा समग्र विकास साधला गेल्याबद्दल खात्री करून घेण्यावर भर दिला. दुर्गम भागात काम करणाऱ्या युवा अभ्यासकांनी जास्तीत जास्त मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल, याबद्दल उपायोजना करून समाजाभिमुख सहभाग नोंदवावा यावर गिरीराज सिंग यांनी भर दिला. ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक बाबी लक्षात घेऊन शाश्वत विकास लक्ष्य साध्य करता येतील, अशा विविध विषयांवरील क्षेत्रं शोधण्यासंदर्भात तरुण अभ्यासकांची भूमिका महत्त्वाची असू शकेल असे ते म्हणाले.
भविष्यातील धोरणांवर चर्चा तसेच आदर्श ग्रामपंचायत देशभरात उभारण्याच्या प्रकल्पाला उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा योग्य वापर आणि पुढील आव्हाने यावर झालेली चर्चा ही या बैठकीचा मुख्य भाग होता. प्रकल्पाची विविध वैशिष्ट्ये आणि प्रकल्पाचा विकास यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
***
Samarjeet T/Vijaya/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1907942)
Visitor Counter : 198