सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
महिलांच्या मालकीचे उद्योग
प्रविष्टि तिथि:
16 MAR 2023 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2023
उद्यम (Udyam) नोंदणी पोर्टलनुसार, संपूर्ण भारतात 01.07.2020 ते 12.03.2023 पर्यंत (13.03.2023 या तारखेला प्रसिद्ध आकडेवारीनुसार) सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची (MSME) आणि महिलांच्या मालकीच्या उद्योगांची एकूण संख्या अनुक्रमे 1,47,50,018 आणि 27,75,390 होती. यासंदर्भात राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार तपशील परिशिष्ट I म्हणून जोडलेला आहे.
2022-23 या वर्षात (28.02.2023 पर्यंत) देशात पत हमी योजने (CGS) अंतर्गत पत हमी मिळालेल्या महिलांच्या मालकीच्या उद्योगांची संख्या 3,40,013 इतकी होती, ज्यांना 14,247.24 कोटी रुपये प्राप्त झाले. यासंदर्भात राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील परिशिष्ट II म्हणून जोडलेला आहे.
2022-23 या वर्षात (28.02.2023 पर्यंत) संपूर्ण भारतात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा (PMEGP) अंतर्गत मार्जिन मनी सबसिडी(अनुदान) मिळालेल्या महिलांच्या मालकीच्या उद्योगांची संख्या 26,241 इतकी होती. यासंदर्भात राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील परिशिष्ट III म्हणून जोडलेला आहे.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग(MSME) मंत्रालयाच्या खरेदी आणि विपणन सहाय्य (PMS) योजनेअंतर्गत, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाद्वारे आयोजित व्यापार मेळावे/प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी स्टॉल भाडे शुल्कासाठी 100% आर्थिक सहाय्य/अनुदान हे महिलांच्या मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना दिले जाते. याव्यतिरिक्त, महिलांच्या मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसह इतर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पीएमएस (PMS) योजनेच्या विविध घटकांतर्गत विविध फायदे/संधी देऊन त्यांची उत्पादने आणि सेवांची विक्रीक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
परिशिष्ट I, परिशिष्ट II, परिशिष्ट III
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907549)
आगंतुक पटल : 211