रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

ईव्ही चार्जिंग स्टेशन्सच्या सुरक्षेबाबत

Posted On: 16 MAR 2023 3:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2023

 

इतर कोणत्याही तांत्रिक अनुप्रयोगाप्रमाणे, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन देखील सायबर-हल्ला आणि सायबर सुरक्षेच्या घटनांचे बळी ठरू शकतात. ‘द इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In)ला  भारतातील सायबर सुरक्षा घटनांचा मागोवा घेणे आणि त्यांचे निरीक्षण करणे बंधनकारक आहे.  त्यांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्समध्‍ये वापरली जाणारे  उत्पादने आणि त्यांच्या  वापराची प्रणाली भेदण्‍यासंबंधी  अहवाल प्राप्त झाले आहेत. यावर सीईआरटी-इन यांनी  उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याचबरोबर  असुरक्षिततेविषयी टिप्पणी  जारी केली आहे. सीईआरटी-दन  नवनवीन  सायबर धोके/असुरक्षा आणि सतत केली जाणारी पा‍हणी या आधारावर संगणक आणि नेटवर्क्सचे संरक्षण करण्यासाठी प्रतिउपाय याबाबत सूचना आणि सल्ले देण्‍यात आले आहेत.

विविध मार्गांनी  असलेल्या  सायबर सुरक्षा  धोक्यांबद्दल सरकार पूर्णपणे जागरूक आहे आणि हॅकिंगच्या समस्येचा सामना करण्यासाठी सक्रियतेने  पावले उचलत आहे. नुकत्याच अधिसूचित केलेल्या सायबर सुरक्षा निर्देशामध्ये, आता सर्व घटनांचा अहवाल ‘सीईआरटी-इन’ला अहवाल देणे ‘सीईआरटी- इन’ ने बंधनकारक केले आहे. सीईआरटीने   केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि विभाग, राज्य सरकारे आणि त्यांच्या संस्था आणि गंभीर क्षेत्रांद्वारे अंमलबजावणीसाठी सायबर-हल्ले आणि सायबर दहशतवादाचा सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन योजना तयार केली आहे. ‘सीईआरटी-इन’ने माहिती सुरक्षेसाठी सर्वोत्तम पद्धतींच्या अंमलबजावणीसाठी समर्थन आणि तपासणी  करण्यासाठी 150 सुरक्षा लेखापरीक्षण संस्थांना पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे.

‘सीआरईटी-इन’ ने नोंदवलेल्या आणि ट्रॅक केलेल्या माहितीनुसार, 2018, 2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांमध्ये सायबर सुरक्षा घटनांची संख्या  अनुक्रमे - 2,08,456;  3,94,499;  11,58,208;  14,02,83; आणि 13,91,457 इतकी आहे.

याविषयी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907539) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu