रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक रस्ते वाहतुकीत महिलांची सुरक्षा

Posted On: 16 MAR 2023 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2023

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) निर्भया फ्रेमवर्क अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत  महिलांच्या सुरक्षेसाठी आणि उद्योग मानक140 च्याअंमलबजावणीसाठी राज्यवार वाहन ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मचा विकास, अनुकूलीकरण, उपयोजन आणि व्यवस्थापन" लागू करण्यासाठी एक योजना तयार केली आहे.  या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे 15 जानेवारी 2020 रोजी जारी करण्यात आली आहेत . या योजनेअंतर्गत, राज्ये/केंद्रशासित प्रदेश   "वाहन उद्योग मानक140"  चे पालन करून एक देखरेख केंद्र (आदेश  आणि नियंत्रण केंद्र किंवा सहायक यंत्रणा ) स्थापन करतील.

निर्भया फ्रेमवर्क अंतर्गत मंजूर केलेल्या इतर प्रकल्पांसह योजनेच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समितीच्या  नियमित बैठका घेतल्या जातात.

देखरेख केंद्रामध्ये वाहन  ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मची रचना, विकास आणि तैनातीसाठी संस्थेची निवड आणि त्याचे मूल्यांकन या बाबी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यांच्या अखत्यारीत  आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

JPS/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1907537)
Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu