उपराष्ट्रपती कार्यालय
ऑस्कर प्राप्ती हा जागतिक स्तरावरचा भारताचा वाढता दबदबा आणि मान्यता याचाच आणखी एक पैलू - उपराष्ट्रपती
'द एलिफंट व्हिस्परर' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन
Posted On:
14 MAR 2023 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2023
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेत 'द एलिफंट व्हिस्परर्स' आणि ' 'नाटू नाटू ' या गीताचा समावेश असलेल्या आर आर आर चित्रपटाच्या चमूचे प्रतिष्ठित अशा 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन केले. हे ऑस्कर विजेते भारताने निर्माण केलेल्या सिनेमाच्या संपूर्ण युगाची नवी ओळख दर्शवतात, असे उपराष्ट्रपतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सभागृहाला संबोधित करताना अधोरेखित केले.
ऑस्करमधील यश हे जागतिक स्तरावरचा भारताचा वाढता दबदबा आणि मान्यता याचाच आणखी एक पैलू असल्याचे धनखड यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, “ या यशातून भारतीय कलाकारांच्या अलौकिक प्रतिभा, अफाट सर्जनशीलता आणि निष्ठा यांना मिळालेली जागतिक प्रशंसा दर्शवते.”
या यशामुळे भारतीय चित्रपट उद्योग मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. राज्यसभेतल्या या त्यांच्या अभिनंदन संदेशाच्या एक दिवस आधी, उपराष्ट्रपतींनी 'द एलिफंट व्हिस्परर'मध्ये 'निसर्गाशी असलेले आपले साहचर्य सुंदर प्रतिबिंबित केल्याबद्दल' प्रशंसा केली होती आणि 'नाटू नाटू' हे गाणे भारताच्या गतिशीलतेचे आणि उर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे:
माननीय सदस्यांनो, लॉस एंजेलिस येथे आयोजित 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात मिळालेले यश हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
कुमारी कार्तिकी गोन्साल्विसचा पहिला चित्रपट "द एलिफंट व्हिस्पर्स" ने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ऑस्कर जिंकला आणि एसएस राजामौली यांच्या आरआरआरच्या मिस्टर एम.एम. कीरावणी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि चंद्र बोस यांनी संगीतबद्ध केलेल्या " नाटू नाटू" या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर मिळाला.
‘द एलिफंट व्हिस्पर्स’आणि आरआरआरच्या या यशामुळे भारतात बनलेल्या सिनेमाला एक नवी ओळख मिळाली आहे. यामुळे भारतीय चित्रपट उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीयीकरण होईल. हे यश भारतीय कलाकारांच्या महान प्रतिभा, अफाट सर्जनशीलता आणि पूर्ण समर्पणाचे जागतिक कौतुक देखील प्रतिबिंबित करतात.आमच्या जागतिक उदय आणि ओळखीची ही आणखीन एक साक्ष आहे.
माझ्या स्वत:च्या वतीने आणि संसदेच्या या वरिष्ठ सदनाच्या वतीने, मी "द एलिफंट व्हिस्पर्स" डॉक्युमेंटरी आणि आरआरआर चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांचे आणि चमूचे या महान कामगिरीबद्दल अभिनंदन करतो.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1906806)
Visitor Counter : 167