नौवहन मंत्रालय
बंदरे आणि नौकानयन केंद्रांसह विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुआयामी संपर्क व्यवस्थेच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे हा पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याचा उद्देश
प्रविष्टि तिथि:
14 MAR 2023 3:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2023
बहुआयामी संपर्क व्यवस्था, दळणवळण यांची कार्यक्षमता सुधारणे हा पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याचा उद्देश आहे. या अंतर्गत कामातील व्यत्यय टाळण्यावर लक्ष केंद्रित करून, प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे सुनिश्चित करणे, लोक तसेच माल वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांमधील महत्त्वाची तफावत दूर करण्याकरता संबंधित मंत्रालये/विभागांमध्ये एकात्मिक आणि सर्वांगीण नियोजनासाठी एक परिवर्तनकारी दृष्टीकोन अंतर्भूत आहे.
बंदरे आणि नौकानयन केंद्रांसह विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुआयामी संपर्क व्यवस्थेच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे हा पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याचा उद्देश आहे.
पंतप्रधान गति शक्ती उपक्रमांतर्गत आतापर्यंत बंदरे आणि जहाजबांधणीच्या संदर्भात अंमलबजावणीसाठी 60,872 कोटी खर्च असलेल्या 101 प्रकल्पांची निवड झाली आहे. यापैकी 4,423 कोटी रुपयांचे 13 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. बंदरे आणि नौकानयन क्षेत्रातील प्रकल्पांची राज्यनिहाय यादी सोबत जोडली आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांकडून वाढीव भांडवली खर्चासाठी, वित्त मंत्रालयाच्या, खर्च विभागाने भाग-II च्या मार्फत (पीएम-गती शक्ती संबंधित खर्चासाठी) "2022-23 साठी राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना" तयार केली आहे. त्यासाठी राज्यांना शून्य व्याज दराने दीर्घकालीन कर्ज देण्यासाठी 5,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने व्यवसाय सुलभतेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मॉडेल सवलत करार, सवलतींसाठी लवचिकता, नवीन दरांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे इ. यासारखी प्रोत्साहने जारी केली गेली आहेत. यामुळे प्रमुख बंदरांवर बंदरांच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते. तथापि, पंतप्रधान गति शक्ती अंतर्गत कोणत्याही उच्च कार्यक्षम बंदरासाठी अतिरिक्त प्रोत्साहनांशी संबंधित कोणतीही योजना नाही.
Annexure
|
State
|
Total No of projects
|
Estimated project cost
(Rs. in Crs )
|
|
Andhra Pradesh
|
13
|
5871.05
|
|
Goa
|
12
|
929.96
|
|
Gujarat
|
19
|
20399.15
|
|
Jharkhand
|
2
|
345.9
|
|
Karnataka
|
10
|
3658.13
|
|
Kerala
|
3
|
109.76
|
|
Maharashtra
|
13
|
9955.85
|
|
Odisha
|
7
|
5528.12
|
|
Pudducherry
|
2
|
309.00
|
|
Tamil Nadu
|
12
|
12178.8
|
|
Uttar Pradesh
|
2
|
355.96
|
|
West Bengal
|
6
|
1230.33
|
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1906718)
आगंतुक पटल : 261