अर्थ मंत्रालय
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू झाल्यापासून देशभरातील 38.58 कोटी व्यक्तींना कर्जाचे वितरण
Posted On:
13 MAR 2023 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2023
मुद्रा पोर्टलवर कर्ज देणाऱ्या सदस्य संस्थांनी अपलोड केलेल्या माहितीनुसार ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू झाल्यापासून 27 जानेवारी 2023 पर्यंत 38.58 कोटींहून अधिक व्यक्तींना कर्जे देण्यात आली आहेत. यापैकी 26.35 कोटींहून अधिक कर्जे महिला उद्योजक (68%) आणि मागासवर्गीय/अनुसूचित जमाती /इतर मागास जाती (SC/ST/OBC) श्रेणीतील कर्जदारांना 19.84 कोटी कर्ज (51%) वितरित करण्यात आली आहेत,अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत रोजगार निर्मितीचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक मोठे नमुना सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, प्रधानमंत्री मुद्रा योजनेने अंदाजे 3 वर्षांच्या कालावधीत म्हणजेच 2015 ते 2018 या कालावधीत देशात 1.12 कोटी निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण करण्यात मदत केली. अशी माहिती मंत्र्यांनी दिली
या योजनेंतर्गत वितरित केलेल्या कर्जाचे जिल्हावार आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील परिशिष्ट I मध्ये दिले आहेत.
Jaydevi PS/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906598)
Visitor Counter : 252