संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारतः विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड सोबत सिंधुकिर्ती या पाणबुडीची सामान्य पुनर्जोडणी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा 900 कोटी रुपयांचा करार
Posted On:
13 MAR 2023 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2023
आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 13 मार्च 2023 रोजी विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड सोबत सिंधुकिर्ती या पाणबुडीची सामान्य पुनर्जोडणी करण्यासाठी एकूण 934 कोटी रुपयांचा करार केला आहे. सिंधुकिर्ती ही किलो श्रेणीतील तिसरी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. पुनर्जोडणीची कामे पूर्ण झाल्यावर सिंधुकिर्ती ही पाणबुडी युद्धासाठी उपयुक्त स्थितीमध्ये येईल आणि भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत असलेल्या पाणबुड्यांच्या ताफ्यात सक्रिया सेवा करू लागेल. ही पुनर्जोडणी पाणबुड्यांची डागडुजी करणारा पर्याय तयार करण्याच्या उद्देशाने केली जात आहे आणि एचएसएलमध्ये आयुर्मान प्रमाणीकरणासह मध्यम स्वरुपाची पुनर्जोडणी हाती घेण्याच्या दिशेने पुढचे पाऊल आहे. या प्रकल्पामध्ये 20 पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) आहेत आणि त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दर दिवसाला 1000 मनुष्य दिवसांचा रोजगार निर्माण होणार आहे.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906536)
Visitor Counter : 183