सांस्कृतिक मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटना (एससीओ ) राष्ट्रांशी भारताच्या सांस्कृतिक संबंधांवर लक्ष केंद्रित करून “सामायिक बौद्ध वारसा” या विषयावर 14-15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Posted On:
13 MAR 2023 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2023
शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) राष्ट्रांशी भारताच्या सांस्कृतिक संबंधांवर लक्ष केंद्रित करून “सामायिक बौद्ध वारसा” या विषयावर नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 14-15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्षपद यंदा भारताकडे असून (17 सप्टेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी) या अंतर्गत अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे, ज्यात "सामायिक बौद्ध वारसा" या विषयावर चर्चा करण्यासाठी मध्य आशियाई, पूर्व आशियाई, दक्षिण आशियाई आणि अरब देश एका समान व्यासपीठावर एकत्र येतील. शांघाय सहकार्य संघटना देशांमध्ये चीन, रशिया आणि मंगोलियासह सदस्य राष्ट्रे, निरीक्षक राष्ट्र आणि संवाद भागीदारांचा समावेश आहे. या कार्यक्रमात 15 हून अधिक विद्वान-प्रतिनिधी उपरोक्त विषयावर आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.
सांस्कृतिक मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ संयुक्तपणे हा दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करत आहे. बौद्ध धर्माचे अनेक भारतीय अभ्यासकही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सहभागींना दिल्लीतील काही ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी देखील मिळणार आहे.
शांघाय सहकार्य संघटना देशांच्या विविध संग्रहालयांच्या संग्रहात तसेच मध्य आशियातील बौद्ध कला, कला शैली, पुरातत्व स्थळे आणि पुरातन वास्तू यांच्यात साधर्म्य शोधणे आणि परस्परांमधील सांस्कृतिक दुवे पुनर्स्थापित करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906488)
Visitor Counter : 878