राष्ट्रपती कार्यालय

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत (LBSNAA) 124 व्या समावेशन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 13 MAR 2023 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत (LBSNAA) 124 व्या  समावेशन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी आज ( 13 मार्च,2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

राष्ट्रपतींनी या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांच्या पदोन्नती व भारतीय प्रशासकीय सेवेत समावेशनाबद्दल अभिनंदन केले. त्यांच्यातील जवळजवळ सर्वच अधिकाऱ्यांनी राज्य सरकारात विविध पदांवर 20 हुन जास्त वर्षे सेवा दिली असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. या त्यांच्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक आव्हाने पेलली तसेच अनेक अवघड निर्णय घेतले असतील, हे त्यांनी अधोरेखित केले. यापुढेही त्यांनी  ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘जनता प्रथम’ या तत्वांप्रमाणे काम करावे असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. भारतीय प्रशासकीय सेवेतील  अधिकारी या नात्याने त्यांनी प्रामाणिकपणे , पारदर्शकतेने आणि वचनबद्ध राहून त्वरित सेवा दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

आपल्या कार्यकाळात प्रशासकीय वातावरण ‘जैसे थे’राखण्यावर अनेकदा अधिकाऱ्यांचा भर असतो.  कधी यासाठी अधिकाऱ्यांची शिथिलता कारणीभूत असते, तर कधी आजूबाजूच्या सतत बदलत्या परिस्थितीत जनतेला भेडसावणाऱ्या नवनवीन समस्यांप्रती अधिकाऱ्यांची उदासीनता यासाठी कारणीभूत असते. यावर मात करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘प्रगतीसाठी बदल आवश्यक’ या मानसिकतेने काम करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

देशाला नवोन्मेषकारी, सक्रिय आणि सुसंस्कृत, व्यावसायिक दृष्टिकोन असलेले, प्रगतिशील, पारदर्शक, उत्साही, नवीन तंत्रज्ञानात पारंगत आणि विधायक विचारांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे, असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. अशा नेतृत्वगुणांनी व मूल्यांनी  परिपूर्ण असलेले प्रशासकीय अधिकारी देश व नागरिकांच्या सेवेसाठी सर्वात जास्त अनुरूप ठरतील असे त्या म्हणाल्या.

Please click here to see the President's Speech - 


Jaydevi PS/U.Raikar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906341) Visitor Counter : 184