संरक्षण मंत्रालय

फ्रेंच नौदलासोबत सागरी भागीदारी सराव(एमपीएक्स)

Posted On: 12 MAR 2023 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

अरबी समुद्रात 10-11 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या फ्रेंच नौदलासोबतच्या सागरी भागीदारी सराव(एमपीएक्स) मध्ये भारतीय नौदलाची संपूर्णपणे देशी बनावटीची गायडेड मिसाईल फ्रिगेट आयएनएस सह्याद्री ही युद्धनौका सहभागी झाली. यामध्ये फ्रेंच नौदलाच्या डिक्समुड ही मिस्ट्रल श्रेणीतील ऍम्फिबियस असॉल्ट नौका आणि ला फायेत श्रेणीची फ्रिगेट एफएस ला फायेत या युद्धनौका सहभागी झाल्या होत्या.

या सरावामध्ये भर समुद्रातील क्रॉस डेक लँडिग्ज, बोर्डिंग एक्सरसाईज आणि सीमॅनशिप सराव यासारख्या विविध प्रकारच्या सरावांचा समावेश होता. अतिशय सुविहित पद्धतीने झालेल्या या सरावामुळे दोन्ही देशांच्या नौदलांची आंतर परिचालनक्षमता आणि उच्च स्तरावरील सहकार्य दृढ झाले.  

आयएनएस सह्याद्री ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज असल्याने हवेतून, पृष्ठभागावरून आणि उपपृष्ठीय भागातून असलेल्या धोक्यांचा शोध घेण्याची आणि ते निष्प्रभ करण्याची तिची क्षमता आहे. ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम येथे तैनात असलेल्या पूर्वेकडील ताफ्याचा एक भाग असून तिचे परिचालनविषयक नियंत्रण ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ  (पूर्व) यांच्याकडे असते.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906161) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil