संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाईदलाची परिचालन क्षमता अधिक वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून सहा डॉर्नियर-228 विमानांसाठी 667 कोटी रुपयांच्या करारावर केली स्वाक्षरी
Posted On:
10 MAR 2023 6:06PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्रालयाने 10 मार्च 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून भारतीय हवाई दलासाठी (IAF) 667 कोटी रुपयांच्या सहा डॉर्नियर-228 विमानांच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली. हवाई दलाने या विमानांचा वापर रूट ट्रान्सपोर्ट रोल आणि संपर्क कर्तव्यांसाठी केला जातो. याशिवाय, हवाई दलातील वाहतूक वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी देखील या विमानांचा वापर करण्यात आला आहे. सध्याच्या सहा विमानांची खेप पाच ब्लेडेड कंपोझिट प्रोपेलरसह अद्यतनित केलेल्या इंधन-कार्यक्षम इंजिनसह खरेदी केला जाईल.
ही विमाने ईशान्येकडील मर्यादित रूपाने तयार/ लहान धावपट्टी आणि भारताच्या बेट मालिकेमधून मध्यम अंतराच्या कार्यान्वयनासाठी योग्य आहेत. या सहा विमानांची भर पडल्याने दुर्गम भागात भारतीय हवाईदलाची परिचालन क्षमता आणखी वाढेल.
2CID.jpg)
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905776)
Visitor Counter : 229