सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई चॅम्पियन्स योजनेअंतर्गत स्पर्धात्मक (लीन) योजनेची केली सुरुवात


लीन मध्ये राष्ट्रीय चळवळ बनण्याची क्षमता असून याद्वारे देशातील एमएसएमई क्षेत्रांना जागतिक स्पर्धात्मकतेसाठीचा एक आराखडा देण्याचे उद्दिष्ट : नारायण राणे

Posted On: 10 MAR 2023 2:55PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज एमएसएमई स्पर्धात्मक योजनेची (LEAN) सुरुवात केली. यावेळी बोलतांना, राणे म्हणाले की एलईएन (लीन) मध्ये राष्ट्रीय चळवळ बनण्याची क्षमता आहे. तसेच या अभियानाद्वारे भारतातील एमएसएमई उद्योगांना राष्ट्रीय स्पर्धात्मकतेचा आराखडा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. लीनमुळे, या उद्योगातील उत्पादनांचा दर्जा, उत्पादकता आणि कामगिरी यात तर सुधारणा होईलच; शिवाय उत्पादकांची मानसिकता बदलण्याची आणि त्यांना जागतिक दर्जाचे उत्पादक बनवण्याची क्षमता देखील यात आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले.

ही योजना, एमएसएमई क्षेत्रात लीन उत्पादक पद्धतींबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देत लीन श्रेणी    गाठण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहन देण्यासाठीची एक व्यापक मोहीम आहे.

या योजनेंतर्गत, एमएसएमई, 5S, कैजर, कांबन, व्हिज्युअल वर्कप्लेस, पोका वोका अशी लीन उत्पादक साधने, प्रशिक्षित आणि सक्षम लीन सल्लागारांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली मूलभूत, मध्यम आणि उच्च यासारख्या लीनमधल्या श्रेणीपर्यंत पोहोचतील. लीनच्या मदतीमुळे, एमएसएमई उद्योगातील नासाडी कमी होऊ शकेल, उत्पादकता, गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढेल आणि हे उद्योग स्पर्धात्मक होऊन फायद्यात चालू शकतील.

एमएसएमई क्षेत्राला आधार देण्यासाठी, या लीनच्या अंमलबजावणी तसेच सल्ला यातील 90 टक्के खर्च सरकार वहन करेल. तसेच जे एमएसएमई उद्योग स्फूर्ती (SFURTI) समूहाचा भाग असतील म्हणजे, महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि ईशान्य भारतात सुरु असलेले उद्योग असतील, अशा उद्योगांसाठी सरकार आणखी 5 टक्के योगदान देईल. या सगळ्या सोबत, उद्योग संघटना/समग्र उपकरण उत्पादन संस्था (OEM) यांच्याद्वारे नोंदणी करण्याऱ्या उद्योगांना, सर्व श्रेणी पूर्ण केल्यानंतर आणखी 5 टक्के मदत सरकारकडून मिळेल. उद्योग संघटना आणि ओईएम यांना पुरवठा साखळी विक्रेत्यांना या योजनेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, हे एक विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.

 

अधिक माहितीसाठी www.lean.msme.gov.in  वर क्लिक करा.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1905598) Visitor Counter : 243


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu