शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात कौशल्य क्षेत्रात मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो यांची भेट घेतली
Posted On:
09 MAR 2023 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2023
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच नवउद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो यांच्यासोबत भारत आणि अमेरिका यांच्यात कौशल्य क्षेत्रात मजबूत संबंध प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बैठक घेतली.

दोन्ही नेत्यांनी भारतीय कौशल्य परिसंस्था अधिक बळकट बनवण्यासाठी तसेच भविष्यातील कर्मचारी वर्ग तयार करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्यावर सहमती दर्शवली, अशी माहिती प्रधान यांनी दिली. आजच्या काळात पदवीपेक्षा कौशल्य आणि क्षमता महत्त्वाची झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मोठ्या प्रमाणावर आजीवन शिकण्याच्या संधी निर्माण करण्याच्या आणि 3 एस - कौशल्य, स्टार्ट-अप आणि सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये आपले सहकार्य अधिक सखोल करण्याच्या मार्गांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली, अशी माहिती त्यांनी दिली.

जीना रायमंडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल आणि भारताच्या वेगवान विकासाच्या दृष्टीबद्दलच्या व्यक्त केलेल्या आदराचे, प्रधान यांनी कौतुक केले.
* * *
S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905444)
Visitor Counter : 157